Thursday, May 2, 2024
Homeनाशिकयेवला येथील मांडूळ तस्करीत २३ तस्करांचा सहभाग निष्पन्न

येवला येथील मांडूळ तस्करीत २३ तस्करांचा सहभाग निष्पन्न

नाशिक | Nashik

जून महिन्यात येवला तालुक्यातील सत्यगाव येथे मांडूळ आणि कासव तस्करांना पकडण्यात स्थानिक वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना यश आले होते.

- Advertisement -

चौकशीअंती पहिल्या टप्प्यात १९ संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा चौघांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे संशयितांचा आकडा २३ वर जाऊन पोहोचला आहे. तर वनविभाग आता उर्वरित तस्करांच्या मागावर असून, त्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

येवला वनविभागाने जूनच्या पहिल्या आठवड्यात मांडूळ आणि कासव तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले होते. दोघा संशयितांना ताब्यात घेतल्यावर तपासाला वेग आला होता. त्यानंतर वनविभागाने १९ संशयितांना ताब्यात घेतले.

या प्रकरणात राज्यस्तरीय तस्करांचा हात असण्याची शक्यता गृहीत धरून वनविभागाने त्या दिशेने तपास सुरू केला आहे. त्यासाठी वाइल्ड लाइफ क्राइम सेलच्या माध्यमातून सर्व संशयितांच्या कॉल डिटेल्सची माहिती घेतली जात असल्याची माहिती नाशिक विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी दिली.

पाेलीस आधिकारी, कर्मचारीही गुंतलेले

संशयितांमध्ये पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचारी, आयटी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने तस्करांच्या हायप्रोफाइल टोळीवर शिक्कामोर्तब झाले होते.

वनविभागाने ‘हायप्रोफाइल’ तस्करांचे नेटवर्क शोधून जुलैमध्ये इतर चौघांना अटक केली आहे. दरम्यान, महिनाभराच्या वनविभागाच्या कोठडीनंतर पहिल्या १९ संशयितांना जामीन मिळाला असून, इतरांची चौकशी सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या