Saturday, September 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने आज टॉर्च मार्च काढण्यात आला.
सायंकाळी 6 वाजता कॅनडा कॉर्नर येथून सुरू होऊन भोसला कॉलेज गेट (कॉलेज रोड) येथे समाप्त झाला. पावसाच्या सावटातही हजारो विद्यथी या मार्च मध्ये सहभागी झाले होते.

या वेळी कॉ. राजु देसले,. तल्हा शेख, पुजा कापडणे,कैवल्य चंद्रात्रे, हर्शली आडागळे, मनीका पगारे, एजाज शहा, प्रथमेश गायकवाड, न्ययरत्न वाकळे, संदीप पगारे, मयुर सानेवणे आदींसह पदाधीकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याच्या प्रयत्नांचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच लोकशाही, शिक्षणाचा हक्क आणि विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी हा मोर्चा काढण्यात आला असे आयोजकानी सांगितले. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडू अशी भूमिका मांडण्यात आली.या टॉर्च मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक आणि नागरिक सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

Rahata : पीक कर्ज पुनर्गठन, परीक्षा शुल्क माफीसह सर्व सवलती लागू;...

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्व तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर...