Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे विभागातील 243 जणांनी केली कोरोनावर मात

पुणे विभागातील 243 जणांनी केली कोरोनावर मात

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) –  पुणे विभागातील 243 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या मंगळवारी संध्याकाळपर्यंत 1 हजार 563 झाली आहे. तर अ‍ॅक्टीव रुग्ण 1 हजार 231 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 53 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

- Advertisement -

विभागात 1 हजार 563 बाधित रुग्ण असून 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 423 बाधीत रुग्ण असून 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 35 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 65 बाधीत रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 29 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 11 बाधीत रुग्ण आहेत.

कालपर्यत (मंगळवार) विभागामध्ये एकुण 16 हजार 670 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 15 हजार 706 चा अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी 14 हजार 162 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 563 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 57 लाख 15 हजार 360 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 17 लाख 88 हजार 617 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 274 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

#Pune#Corona#Update
२७ एप्रिल
– दिवसभरात १२२ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– पुण्यात दोन  करोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू.
– डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण ५१० रुग्णांवर उपचार.
– करोनाचा संसर्ग झालेले २७ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
– ७३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पाॅझिटिव्ह रूग्णसंख्या १३३९
– पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या- १०५७.
- Advertisment -

ताज्या बातम्या