Saturday, April 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआ. राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले यांचे निधन; पंचवटीत शोकाकुल वातावरणात...

आ. राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले यांचे निधन; पंचवटीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्या पत्नी सौ. आदिती राहुल ढिकले (४०) यांचे शनिवारी (दि. २५) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे नाशिकच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली असून, पंचवटीतील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, आदिती ढिकले यांची शुक्रवारी प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी सकाळी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती आणि एक मुलगा असा परिवार आहे. आदिती ढिकले या मूळच्या मखमलाबाद येथील माहेरवाशीण होत्या.

आ. राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती यांचे निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरले. त्यानंतर नाशिकच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढिकले यांच्या नागचौकातील निवासस्थानी धाव घेत आदिती यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी उशिरा पंचवटीतील गणेशवाडी येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा देशभर जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल – उपमुख्यमंत्री...

0
अहिल्यानगर । वृत्तसंस्था श्री क्षेत्र चौंडी ही मराठी संस्कृतीचे माहेरघर असून गेल्या ३०० वर्षांपासून ही भूमी राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ‘गोदा ते नर्मदा’ यात्रेचा...