Saturday, June 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकार - ट्रकचा अपघात; दोघांचा मृत्यू

कार – ट्रकचा अपघात; दोघांचा मृत्यू

सिन्नर | वार्ताहर Sinnar

- Advertisement -

सिन्नर-शिर्डी महामार्गावर तालुक्यातील दातली शिवारात कार व आयशर ट्रकच्या झालेल्या भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि. २५ एप्रिल २०२६ ) ३.३० च्या दरम्यान घडली.

महामार्गावर असलेल्या हॉटेल शुभारंभसमोर असलेल्या गतिरोधकामुळे पुढे चाललेल्या आयशर क्र. एम. एच. १५/ के. एस. ५१५२ चा वेग अचानक कमी झाला. त्याच वेळी मागून भरधाव वेगात येणार्‍या सियाझ कार क्र. जी. जे. ०५/ जे. एस. ६१५४ ने आयशरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात कारमधील दोन्ही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले.

महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. कारमधील प्रवासी हे गुजरातचे असून ते शिर्डी येथे साई बाबांच्या दर्शनासाठी जात होते. दरम्यान, दातली शिवारात महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू होत असल्याने टाकण्यात आलेल्या गतिरोधकामुळे भीषण अपघात झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्या

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख; ३० जूनपासून स्वीकारणार पदभार

0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था New Delhi केंद्र सरकारने सध्या उपलष्करप्रमुख (Vice Chief of Army Staff) म्हणून कार्यरत असलेल्या लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताच्या पुढील...