Tuesday, September 29, 2026
HomeनगरAccident News : मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

Accident News : मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Nashik-Pune Highway) वेल्हाळे शिवारातील हॉटेल अंबिका समोर नाशिकवरुन पुणेकडे जाणार्‍या एका मालवाहू वाहनाने समोरुन दिलेल्या धडकेत डोंगरगाव (ता.अकोले) येथील दुचाकीस्वार तरुण जागीच ठार (Youth Death) झाला. सदर घटना गुरुवारी (दि.23) रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की डोंगरगाव येथील दिगंबर रामदास उगले (वय 27) हा तरुण वाहनांच्या शोमरुममध्ये कामास होता.

- Advertisement -

नेहमीप्रमाणे गुरुवारी तो त्याच्या दुचाकीवरुन (क्र.एमएच.15, एआर.5240) कामाला गेला होता. त्याच रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास वेल्हाळे शिवारातील हॉटेल अंबिका समोर नाशिकवरुन पुणेकडे जाणार्‍या मालवाहू वाहनाने (क.एमएच.17, सीव्ही.5131) समोरुन जोराची धडक (Hit) दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिकांनी रुग्णवाहिकेतून घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले.

दरम्यान, सदर मालवाहू वाहनावरील चालक अपघात (Accident) झाल्यानंतर पोलिसांत खबर न देता पळून गेला. याप्रकरणी मयत तरुणाचे वडील रामदास कुंडलिक उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी मालवाहू वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...