Saturday, November 16, 2024
Homeजळगावजिल्ह्यात २५ कोटींचे उद्योग भवन उभारणार- उद्योगमंत्री उदय सामंत

जिल्ह्यात २५ कोटींचे उद्योग भवन उभारणार- उद्योगमंत्री उदय सामंत

जळगाव । प्रतिनिधी jalgaon
गेल्या सव्वादोन वर्षात राज्यात 75 हजार कोटींची गुंतवणूक केली असून जळगाव जिल्ह्यासाठी 25 कोटींचे उद्योग भवन जळगावात उभारणार असून त्या उद्योग भवनात प्रादेशिक कार्यालय देखील उभारणार असून येत्या दोन दिवसात जीआर काढणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. जळगाव येथील छत्रपती संभाजी नाट्यगृह येथे गुरुवारी उद्योग भरारी कार्यक्रमानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा.स्मिता वाघ, आमदार लता सोनवणे, आ.राजूमामा भोळे, आ.किशोर पाटील आदी उपस्थित होते. उद्योगमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, राज्यात सव्वादोन वर्षात आतापर्यंत 32 हजार नवीन उद्योग उभारण्यात आले असून त्या योजनेच्या माध्यमातून विश्वकर्मा योजना यासह विविध योजना राबवून त्याचे वाटप देखील करण्यात आले.

- Advertisement -

तसेच जळगाव जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर उद्योग उभारणी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयतनशील असल्याचे त्यांनी सांगितले.जळगाव जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असून लवकरात लवकरच उद्योग भवनाच्या जागेचे भूमिपूजन जळगावात करण्यात येणार आहे. या उद्योगांना एक प्रादेशिक कार्यालय देखील असावे अशी मागणी काही उद्योजकांनी केली होती. त्यानुसार उद्योग भवनात प्रादेशिक कार्यालय देखील राहणार असून तसा अध्यादेश शासन दोन दिवसात काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जळगावात टेक्सटाईल पार्क का नसावे, यासंदर्भात विचारणा केली असता त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, राज्यात नागपूर, अमरावती येथे मागणी असतानाही शेवटी अमरावतीला टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे. तसेच जळगावातही टेक्सटाईल पार्क मंजूर असून त्यासाठी उद्योजक व आजारी उद्योग असलेल्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी उद्योजकांना सांगू शकतो.मात्र, जबरदस्ती करु शकत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या