Thursday, January 8, 2026
HomeनाशिकNashik Accident News : बस-ट्रकच्या अपघातात २५ जण जखमी

Nashik Accident News : बस-ट्रकच्या अपघातात २५ जण जखमी

पेठ | प्रतिनिधी | Peth

नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावरील (Nashik-Peth National Highway) देवगाव फाटा नजिक पेठ आगाराची एमएच १४ बीटी ४२०८ ही बस पेठकडून-नाशिककडे (Peth to Nashik) जात असतांना एका आयशरने धडक दिल्याने २५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : अनाठायी धाडस जीवघेणे!

YouTube video player

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकहून (Nashik) पेठकडे जाणारा आयशर ट्रक क्रमांक एमएच ०४ एफपी १०५२ भरधाव वेगाने ओव्हरटेक करीत असतांना वाहन अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाले. या आयशर ट्रकने ( Eicher Truck) बसला धडक दिल्याने बसमधील प्रवाशांतील बहुतांश विद्यार्थी जखमी झाले. यामध्ये बसचालक व्यंकटी विठ्ठलराव गिते व ट्रक चालक रामेश्वर पाटील, वसंत दहिले (वय २५) रा.झार्ली, निर्मला अलबाल (वय ३२) हे गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला रवाना करण्यात आले.

हे देखील वाचा : Nashik News : नगरपालिका कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन

तर बसमधील गंगुबाई मिसाळ (वय ६०) गब्बरशहा फकीर (वय ४६) अनिकेत भोये (वय १२) अश्विनी पागे (वय १०) आदित्य ठेपणे (वय १३) नेहा गांगुर्डे , विशाल ठाकरे (वय १७) सागर वाघेरे (वय १९) वंदना राऊत (वय ३५) दिवाकर राऊत (वय ३८) नम्रता राऊत (वय १७) मनिषा टोपले (वय २३) धनराज जोगारे (वय ३५) मंगला बागुल (वय ३५) ममता शिंगाडे (वय ५०) विठाबाई कडाळे (वय ६०) हेमंत भुसारे (वय २६) अजित तुंबडे (वय १२) भिमाबाई भुसारे (वय ६०) विमल जाधव (वय ५०) हे जखमी झाले आहेत.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

नगरसेवक

Ambernath: अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ‘ते’ १२ नगरसेवक भाजपच्या गोटात

0
मुंबई | Mumbaiअंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसने केलेली युती राज्यात चर्चेत ठरली आहे. येथील सत्ताधारी भाजपला काँग्रेस नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावरुन पाठिंबा दिला होता. त्यावरुन, सुरू...