Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजधर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडे

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडे

नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, नवीन शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या आदेशानुसार, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार प्रल्हाद जोशी हे त्यांच्या विद्यमान मंत्रालयांसह शिक्षण मंत्रालयाचे कामकाजही पाहतील. नवीन शिक्षणमंत्र्याची नियुक्ती होईपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरांतून केली जात होती. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. राष्ट्रपतींनी तो स्वीकारल्यानंतर केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्याची अधिकृत घोषणा केली.

दरम्यान, शिक्षणमंत्रीपदासाठी लवकरच नव्या नावाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, तोपर्यंत शिक्षण मंत्रालयाच्या सर्व प्रशासकीय जबाबदाऱ्या प्रल्हाद जोशी सांभाळणार आहेत.

ताज्या बातम्या

Accident News : तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; ५...

0
बीड | Beed बीड जिल्ह्यातील (Beed District) माजलगाव तालुक्यात (Majalgaon Taluka) खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी फाट्याजवळ आज (रविवारी) सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण...