Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकातील विमानसेवांच्या माध्यमातून २६० बड्या शहरासाठी संधी; वाचा सविस्तर

नाशकातील विमानसेवांच्या माध्यमातून २६० बड्या शहरासाठी संधी; वाचा सविस्तर

सातपूर | प्रतिनिधी

स्पाईक जेटच्या माध्यमातून नाशिकमधून तीन शहरांसाठी जरी सेवा सुरू करण्यात येत असली, तरी या माध्यमातून देशांतर्गत व विदेशातील 260 विविध ठिकाणच्या विमानसेवांचे कनेक्शन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे निश्चितच नाशिककरांना आज असलेली अडचण दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास स्पाईक जेट च्या कार्मिक विभागाच्या व्यवस्थापिका किन्नरी मेहता यांनी व्यक्त केला…

- Advertisement -

नाशिक परिसरातून दिल्ली, हैदराबाद व बंगळुरू या शहरासाठी विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. याबाबत उद्योजकांना आवाहन करण्याच्या उद्देशाने आयमा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत आयमा, नाईस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, नरेडको, तान आदीं संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उद्योजक उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीमती मेहता यांनी शासनाच्या निर्देशानुसार केवळ 60 टक्के क्षमतेवर विमानसेवा सुरू करण्यात आली असून, त्यामुळे निश्चितच नाशिककरांना मोठा फायदा मिळणार आहे.

180 आसन क्षमतेचे व्हाईट बॉडी विमान उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या विमानसेवेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

नाशिक विमानसेवा आंतरराष्ट्रीय नकाशावर राहण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच आंतरराष्ट्रीय विमान सेवेसह इंटरनॅशनल कुरीयर हब उघडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. एचएएलच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.

नाशिकमधून सद्यस्थितीत हैदराबाद, अहमदाबाद व पुणे या शहरात साठी सेवा सुरू आहेत. लवकरच नाशिक बेळगाव विमान सेवा सुरू केली जाणार असून, या पाठोपाठ च्या माध्यमातून हिंदी व बंगळुरू शाळेला जोडले जाणार असल्याने शहरातील पर्यटन व्यवसाय सोबत उद्योग क्षेत्राला नवी उभारी घेण्याची संधी मिळणार असल्याचे संकेत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक करताना आयमा अध्यक्ष वरूण तलवार यांनी नाशिकमधून गोवा व चेन्नई साठी पर्यटक संख्या मोठी आहे. या शहरांना जोडणारी सेवाही सुरू करण्यात यावी. कंपनीने त्या दृष्टीनेही विचार करावा,अशी सूचना मांडली.

यावेळी श्री सिंग यांनी विमानसेवा कार्गो ची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. नाशकातून ताजा भाजीपाला, फळे मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात होतात. सहा ते सात टन मटेरियल युरोपे, युके साठी जात असते.

या विमान सेवेमध्ये त्याचाही विचार करण्यात यावा, अशी सूचना मांडली. स्वप्निल डांगरीकर यांनी विमानसेवा सुरू केल्यानंतर त्याचे योग्य पद्धतीने प्रसिद्धी होण्यावर भर देण्याची मागणी केली. नाशिक मध्ये पर्यटकांची संख्या जास्त असली तरी माहितीअभावी या सेवेचा लाभ घेतला जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आयमाच्या एव्हिएशन कमिटीचे मनीष रावल यांनी गोवा, चेन्नई सह नागपूर साठीही विमान सेवेचा विचार करावा, अशी सूचना मांडत उपलब्ध विविध सुविधा बद्दलची माहिती सांगितली. सुत्रसंचलन ललित बूब यांनी केले तर आभार निखील पांचाळ यांनी मानले.

यावेळी दत्ता भालेराव, रमेश वैश्य, राजू अहिरे, सुचित धुमाळ, हे हे व्यासपीठावर होते यावेळी विमान सेवेबाबत उद्योजकांनी विविध प्रश्न उपस्थित करून शंकासमाधान करून घेतले यावेळी उद्योजकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या