Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्हा रुग्णालयास ३०० पीपीई किट्स उपलब्ध

नाशिक जिल्हा रुग्णालयास ३०० पीपीई किट्स उपलब्ध

नाशिक। प्रतिनिधी

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना बाधित अथवा कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी व्हायरस प्रतिबंधक ३०० ‘पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट’ (पीपीई किट्स)उपलब्ध करण्यात आले आहेत.  त्यामुळे कोरोना बाधित व कोरोना संशयीत रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांची वैयक्तिक आरोग्य सुरक्षेची पूर्णतः काळजी
प्रशासकीय पातळीवर घेतली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करणेकरीता सर्व संबंधीत इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या आज अखेर झालेल्या कामकाजाची माहिती देताना  यावेळी ते म्हणाले, पाच हजार एन-९५ मास्क, ५० हजार थ्री लेअर मास्क, एक हजार एक्स रे फिल्मस जिल्हा सामान्य रुग्णालयास उपलब्ध करून देण्यात आले आहे.

देवळालीत विलगिकरण हाँस्पिटल

बार्नेस स्कूल, देवळाली कॅम्प येथे विलगीकरण हॉस्पिटल तयार करण्यासाठी संबंधीत संस्थेने संमती दर्शविलेली आहे. त्याठिकाणी २०० खाटांचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या