Monday, June 17, 2024
HomeनाशिकNashik News : ३५ हवालदार झाले एएसआय, ७८ अंमलदारांना पदोन्नती

Nashik News : ३५ हवालदार झाले एएसआय, ७८ अंमलदारांना पदोन्नती

तिघे झाले ग्रेड पीएसआय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

निवडणूक प्रक्रिया संपल्याने पोलिस दलातील प्रशासकीय कामांना वेग आला आहे. एकीकडे पोलिस भरतीच्या (Police Recruitment) मैदानी चाचणीची तयारी सुरु असताना दुसरीकडे ७८ पोलिस कर्मचाऱ्यांची पदोन्नती (Promotion) करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन सहायक उपनिरीक्षकांना ‘ग्रेड पीएसआय’ पदी बढती मिळाली आहे. तर ३५ हवालदारांना सहायक उपनिरीक्षक आणि ४० पोलिस नाईकांना हवालदार पदी बढती देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघात ट्विस्ट; किशोर दराडे, संदीप गुळवे यांचा उमेदवारी अर्ज मागे

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांना पोलिस अंमलदारांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पोलिस (Police) सेवेत तीस वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेले आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक पदी तीन वर्षे कर्तव्य पार पाडलेल्या तिघांना श्रेणी उपनिरीक्षक पदी पदोन्नती दिली आहे. त्यामध्ये पोलिस मुख्यालयातील अनिवाश कालिदास झोपे, शहर वाहतूक शाखेतील साहेबराव रामदास गवळी आणि अशोक बबनराव तांबे यांचा समावेश आहे. यासह ३५ हवालदारांना सहायक पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाली आहे.

हे देखील वाचा : विधानपरिषद निवडणुकीवरुन मविआत ठिणगी; पटोलेंचा फोन ठाकरेंनी टाळला?

त्यामध्ये मोटर परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखा, मुख्यालय, नागरी हक्क संरक्षण, विशेष शाखा यासह पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर ४० पोलिस नाईक पदावरील कर्मचाऱ्यांची हवालदार पदावर बढती झाली. दरम्यान, शहर पोलिस आयुक्तालयातील काही कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. निवडणुकीपूर्वी (Before The Election) संबंधित कर्मचाऱ्यांच्या पसंतीचे संवर्ग मागवून त्याची यादीही महासंचालक कार्यालयामार्फत जारी करण्यात आली होती. परंतु, अजूनही त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी न झाल्याने त्यांच्यात नाराजीच आहे.

लवकरच बदल्यांना मुहूर्त

शहर पोलिस दलातील काही कर्मचारी व अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत आहे. निवडणुकीपूर्वी नव्याने काही अधिकारी आयुक्तालयात दाखल झाले आहेत. तर कर्मचाऱ्यांना पोलिस ठाणे बदलून हवे आहे. त्यासाठीचे अर्ज देखील मुख्यालय विभागाकडे प्राप्त झाल्याचे कळते. पुढील काही दिवसांत बदल्यांचेही वारे आयुक्तालयात वाहणार आहेत. तर असमाधानकारक कामगिरीमुळे काही पोलिस निरीक्षकांचीही बदली केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोणत्या पोलिस ठाण्यांच्या ‘प्रभारीं’त बदल होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या