Monday, June 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानपरिषद निवडणुकीवरुन मविआत ठिणगी; पटोलेंचा फोन ठाकरेंनी टाळला?

विधानपरिषद निवडणुकीवरुन मविआत ठिणगी; पटोलेंचा फोन ठाकरेंनी टाळला?

नाशिकचा उमेदवार मागे घ्या, काँग्रेसचा निरोप

मुंबई | Mumbai

- Advertisement -

लोकसभेनंतर (Loksabha) राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या २६ जूनला विधानपरिषदेच्या (Legislative Council) या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान होणार असून १ जुलैला मतमोजणी होणार आहे. मात्र, अशातच आता लोकसभेला राज्यात महाविकास आघाडी म्हणून घवघवीत यश मिळविलेल्या कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत (Congress and Thackeray’s Shiv Sena) विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : “…तर भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही”; मोदींच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर

विधान परिषदेच्या चारही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यावरून काँग्रेस नेते प्रचंड नाराज असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेचे उमेदवार मागे घ्या, असा निरोप ठाकरेंना दिल्याची माहिती मिळत आहे. तसेच नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) फोन केला असता त्यांनी पटोलेंच्या फोनला कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला देखील संतप्त असल्याचे सांगितले जात आहे.

हे देखील वाचा : Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघात ट्विस्ट; किशोर दराडे, संदीप गुळवे यांचा उमेदवारी अर्ज मागे

यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे ज्यावेळी लंडनमध्ये गेले त्यावेळी देखील मी त्यांना फोन केला होता. त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो की, तुम्ही दोन जागा लढा आम्ही दोन जागा लढतो. तेव्हा ते म्हणाले, तुमचे उमेदवार कोण आहेत? मग मी उमेदवारांची नावे सांगितली. नाशिकमधील जे उमेदवार होते. त्यांना ठाकरेंनी बोलावून घेतले आणि उभे केले. महाविकास आघाडीत चर्चा करून निर्णय घेतला असता तर या चारही जागा आम्हाला जिंकणे सोप्पे झाले असते असे पटोले यांनी म्हटले.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक : शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन अर्ज केले दाखल

तसेच “मी सकाळपासून उद्धव ठाकरेंना फोन लावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांचे ऑपरेटर आमच्या ऑपरेटरला साहेब तयार होत आहेत असा निरोप देत आहेत. माझ्याशी काय उद्धव ठाकरेंचा संपर्क झालेला नाही. त्यामुळे नेमके त्यांच्या मनात काय आहे हेच कळत नाही. आम्ही मुंबईत उमेदवार दिले नाही. त्यांचा मुंबईत रस असतो हे आम्हाला माहिती आहे. मात्र, त्यांनी परस्पर त्यांचे उमेदवार जाहीर केले. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची भूमिका आहे”, असेही नाना पटोले म्हणाले. त्यामुळे आता यावरून महाविकास आघाडीत चांगलाच खल होण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या