Friday, May 17, 2024
Homeधुळेजिल्ह्यात 38 कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 38 कोरोना पॉझिटिव्ह

धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात नवीन 38 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले.

- Advertisement -

बाधितांची एकुण संख्या 15 हजार 68 इतकी झाली आहे. त्यापैकी 14 हजार 504 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हा रुग्णालय धुळे येथील 129 अहवालांपैकी 18 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 33 अहवालांपैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 71 अहवालांपैकी 4 व खाजगी लॅबमधील 37 अहवालापैकी 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

दरम्यान जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी झाली होती. मात्र मंगळपासून पुन्हा संख्या वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी देखील नियमांचे पालक करणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या