Sunday, May 19, 2024
Homeजळगावकरंजी येथे केटीवेअर बंधाऱ्यात बुडून 45 वर्षीय इसमाचा मृत्यू

करंजी येथे केटीवेअर बंधाऱ्यात बुडून 45 वर्षीय इसमाचा मृत्यू

पारोळा Parola (प्रतिनिधी)

तालुक्यातील करंजी बुद्रुक (Karanji Budruk) येथील गुलाब संतोष रोकडे वय 45 यांचा केटीवेअर बंधाऱ्यात (Ketware Dam) बुडून मृत्यू (death by drowning) झाल्याची घटना आज दिनांक 10 रोजी उघडकीस आली.

- Advertisement -

याबाबत योगेश प्रकाश रोकडे यांनी खबर दिली की गुलाब संतोष रोकडे वय 45 रा करंजी बु हे काल दि 9 रोजी सायंकाळी गावातील 6 वाजेचे सुमारास गणपती विसर्जन संपवुन सायंकाळी 6.30 वाजेचे सुमारास त्याचे शेतात गुराढोरांना चारापाणी करणे साठी गेले असता ते रात्री परत ‘घरी आले नाही म्हणुन रात्री गावात व आजु बाजुच्या परिसरात त्यांचा शोध घेतला. ते मिळुन आले नाही.

दि. 10 रोजी आम्ही परत त्यांचा पहाटे 7 वाजता गावातील तुकाराम संतोष रोकडे, ज्ञानेश्वर आधार रोकडे, रविंद्र अर्जुन पाटील अशांसह त्याचे शेता जवळील केटीवेअर (बंधारा) जवळ जावुन पाहीले असता ते तरंगतांना दिसुन आले. या बाबत पारोळा पो स्टे ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या