Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रLoksabha Election 2024 : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात ४७.५३ तर महाराष्ट्रात ३८.७७...

Loksabha Election 2024 : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात ४७.५३ तर महाराष्ट्रात ३८.७७ टक्के मतदान

मुंबई | Mumbai

देशात आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात (Fifth Phase) आठ राज्यांमधील ९४ जागांसाठी मतदान (Polling) प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये बिहार, जम्मू काश्मीर, झारखंड, लडाख, महाराष्ट्र, ओडीसा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील (Maharashtra) धुळे, भिवंडी, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, दिंडोरी, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या १३ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे आता दुपारी तीन वाजेपर्यंत देशातील आठ राज्ये आणि महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : दुपारी तीन वाजेपर्यंत नाशिकसाठी ३९.४१ तर दिंडोरी लोकसभेसाठी ४५.९५ टक्के मतदान

त्यानुसार दुपारी तीन वाजेपर्यंत देशात ४७.५३ टक्के तर महाराष्ट्रात ३८.७७ टक्के इतके मतदान झाले आहे. यातील बिहार ४५.३३ टक्के, जम्मू काश्मीर ४४.९० टक्के, झारखंड ५३.९० टक्के, लडाख ६१.२६ टक्के, महाराष्ट्र ३८.७७ टक्के, ओडीसा ४८.९५ टक्के, उत्तर प्रदेश ४७.५५ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये ६२.७२ टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये ६२.७२ टक्के तर सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात ३८.७७ टक्के इतके झाले आहे. त्यामुळे मतदानाची सर्वात कमी टक्केवारी असणाऱ्या महाराष्ट्रात मतदानाच्या उर्वरित वेळेत टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : सकाळी अकरा वाजेपर्यंत नाशिकमध्ये १६.३० तर दिंडोरीत १९.५० टक्के मतदान

तर महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघातील धुळ्यामध्ये ३९.९७ टक्के, भिंवडीत ३७.०६ टक्के, ठाणे ३६.०७ टक्के, कल्याण ३२.४३ टक्के, पालघर ४२.४८ टक्के, नाशिक ३९.४१ टक्के, दिंडोरी ४५.९५ टक्के, उत्तर मुंबई ३९.३३ टक्के, उत्तर मध्य मुंबई ३७.६६ टक्के, उत्तर पूर्व मुंबई ३९.१५ टक्के, उत्तर पश्चिम मुंबई ३९.९१ टक्के, दक्षिण मुंबई ३६.६४ टक्के आणि दक्षिण मध्य मुंबईत ३८.७७ टक्के इतके मतदान झाले आहे. यात सर्वात जास्त मतदान दिंडोरीत ४५.९५ टक्के तर सर्वात कमी मतदान कल्याणमध्ये ३२.४३ टक्के इतके मतदान झाले आहे.

हे देखील वाचा : लोकसभा निवडणूक २०२४ : अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या