Sunday, September 6, 2026
HomeराजकीयSanjay Raut : शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटींचं घबाड सापडलं; संजय राऊत म्हणाले,...

Sanjay Raut : शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटींचं घबाड सापडलं; संजय राऊत म्हणाले, ‘काय झाडी.. काय डोंगर..’

पुणे | Pune

- Advertisement -

राज्यात निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागली असताना पुणे पोलिसांना एक मोठं घबाड सापडलं आहे. काल पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याचा दावा केला जात आहे.

त्यातच आता या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. संजय राऊतांनी ट्विट करून शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीतून खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले. हे आमदार कोण? काय गाडी.. काय डोंगर.. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले. १५ कोटींचा हा पहिला हप्ता! काय बापू किती हे खोके?

संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यांनी थेट शिंदे गटाच्या आमदारावर निशाणा साधला आहे. तसेच, त्यांनी प्रत्येक उमेदवाराला ७५ कोटी रुपये पाठवण्यात आल्याचा दावा देखील केला आहे. आता याला शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिलं जाईल, त्याकडे सर्वांचं लक्ष राहील.

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड-शिवापूर टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान ही घबाड जप्त केली आहे. इनोव्हा क्रिस्टा या कारमध्ये ही रोकड आढळली. ही कार सांगोल्याची असून ती नलवडे नामक व्यक्तीच्या नावावर आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील माहिती मिळताच या ठिकाणी दाखल झाले. या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. ज्या गाडीत हे घबाड सापडलं ती कार नेमकी कुणाची?, याबाबत आता चर्चा रंगल्या आहेत.

ताज्या बातम्या

Gulabrao Patil : “भाजप पक्ष फोडतो, तसे शिक्षकांनी…”; मंत्री गुलाबराव पाटलांच्या...

0
जळगाव | Jalgaon शिक्षकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी फोडून त्यांना मराठी शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला पाहिजे, असा मिश्कील टोला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री...