Thursday, June 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजएसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी येथे केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करताना कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय सरनाईक यांनी जाहीर केला.

मुंबई सेंट्रल येथील ‘वाहतूक भवन’ या महामंडळाच्या मुख्यालयात आज राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सरनाईक यांनी बैठक घेतली. ठकीत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी सरनाईक यांनी महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात वाढ करण्याचे घोषित केले. या निर्णयाचा लाभ एसटी महामंडळातील ८६ हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.

भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावाने एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला देताना सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची थकबाकीही आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने अदा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी ठोस उपाययोजना सुरू असून बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर कठोर कारवाईसाठी एसटीच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरुद्ध धडक मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. त्याचा चांगला परिणाम एसटीच्या उत्पन्न वाढीवर झाला असून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल, असे सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीत कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, सेवाशर्ती, रिक्त पदभरती, बसस्थानक विकास, कल्याणकारी योजना तसेच महामंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

ताज्या बातम्या

कारवाई

Shivsena Operation Tiger: ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांवर काय कारवाई होणार? खासदारकी राहणार...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राच्या राजकारणात चार वर्षानंतर पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सहा खासदार हे बंडखोरी करून वेगळा...