Saturday, June 13, 2026
HomeनगरAhilyanagar : दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार्‍यांची संख्या घटणार

Ahilyanagar : दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार्‍यांची संख्या घटणार

प्रोत्साहनपर लाभ मिळणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महायुती सरकारने अखेर मंगळवारी (2 जून) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेचा अध्यादेश जारी करण्यात आल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात केवळ 50 हजार रूपये मिळणार्‍या शेतकर्‍यांची संख्या सर्वाधिक असून दोन लाख कर्जमुक्ती मिळणार्‍या शेतकर्‍यांची संख्या फारच कमी असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांना केवळ 50 हजार रूपये मिळणार आहेत. त्यामुळे ही मोठी थकबाकीदार शेतकर्‍यांची संख्या दोन लाख कर्जमुक्तीसाठी अपात्र ठरणार आहे.

- Advertisement -

मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून त्याचे निकष व अटी निश्चित करणारा शासन आदेश देखील काढण्यात आला. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत पीककर्ज थकीत असणार्‍या पात्र शेतकर्‍यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. तसेच जे शेतकरी नियमित परतफेड करतात अशा शेतकर्‍यांनाही प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 50 हजार रूपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

त्यानुसार कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यापूर्वी शासनाने जिल्हा बँकांसह खासगी व राष्ट्रीयकृत बँकांकडून माहिती मागविली होती. त्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यात बँकेचे 2 लाख 74 हजार 532 थकबाकीदार खाते आहेत. या खातेदारांकडे सुमारे 3381 कोटी 10 लाख रूपये थकबाकी आहे. त्यात सर्वाधिक श्रीगोंदा तालुक्यात 64 हजार 753 खातेदार असून त्यांच्याकडे 935 कोटी थकबाकी आहे. तर त्याखालोखाल नेवासा तालुक्यात 39 हजार 826 खातेदार असून 523 कोटी थकबाकी आहे. सर्वात कमी कोपरगाव तालुका असून 5 हजार 225 खातेदारांकडे 61 कोटी थकबाकी आहे.

तर नियमित परतफेड करणार्‍या सभासदांची संख्या 6 लाख 1 हजार 140 असून त्यांची रक्कम 6538 कोटी 22 लाख 52 हजार रूपये होत आहे.
सन 2019 मधील महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या तुलनेत सन 2026 मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत मोठे बदल करण्यात आले आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे 2019 मधील महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार्‍या शेतकर्‍यांना या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये केवळ 50 हजार रूपये मिळणार आहे. ते 2 लाख रूपयेपर्यंत कर्जमुक्तीला पात्र ठरणार नाहीत. त्यांनी थकबाकी असलेली रक्कम भरल्यानंतर त्या खातेदाराला 50 हजार रूपये मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या कर्जमुक्ती योजनेत 2 लाख रूपयेपर्यंत कर्जमुक्ती मिळणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे.

2026 मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत 31 मार्च 2017 पर्यंत 2 लाख कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर 2 लाख मिळणार आहे. तसेच एकासह अनेक बँकेची परतफेड असली तरी एकत्रित 2 लाख रूपये कर्जमुक्ती मिळणार आहे. तरी देखील उर्वरित रक्कम जमा केल्यानंतर दिली जाणार आहे. हे बदल यंदाच्या कर्जमुक्ती योजनेत करण्यात आले आहेत.

अडीच लाख शेतकर्‍यांना 50 हजार रूपये
2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्हा सहकारी बँकेचे 2 लाख 51 हजार 17 शेतकरी संख्या होती. त्यांना 1411 कोटी 8 लाख कर्जमुक्ती मिळाली आहे. त्यामुळे या 2 लाख 51 हजार 17 शेतकर्‍यांना 50 हजार रूपये मिळणार आहे. ते 2 लाखपर्यंतच्या कर्जमुक्तीसाठी पात्र होणार नाहीत.

ताज्या बातम्या

Jalgaon Vidhan Parishad Election : नाशिकनंतर जळगावचाही तिढा सुटला; बंडखोर रेश्मा...

0
जळगाव | Jalgaon स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीत (Jalgaon Vidhan Parishad Election) महायुतीसमोर (Mahayuti) उभे ठाकलेले बंडखोरीचे संकट अखेर टळले आहे. शिवसेना (शिंदे...