Saturday, September 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपुतिन यांचा मोठा निर्णय; रशिया-युक्रेन यांच्यात तीन दिवसांचा युद्धविराम

पुतिन यांचा मोठा निर्णय; रशिया-युक्रेन यांच्यात तीन दिवसांचा युद्धविराम

- Advertisement -

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या चार वर्षांपासून युद्ध सुरूच आहे. रशियाकडून युक्रेनवर भीषण हल्ले करण्यात आले आहेत, मात्र आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी तडकाफडकी मोठी घोषणा केली आहे.रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनची राजधानी कीव्हवरील हल्ले तीन दिवसांसाठी थांबवण्याचे आदेश दिले आहेत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी शनिवारी या निर्णयाची माहिती दिली.

पेस्कोव्ह यांच्या माहितीनुसार, कीव्हवरील रशियन हवाई हल्ल्यांना मध्यरात्रीपासून तीन दिवसांची तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा करण्यासाठी मॉस्कोमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या नियोजित कीव्ह दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे क्रेमलिनने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनीही अमेरिकन प्रतिनिधींच्या दौऱ्यादरम्यान हवाई हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेनदरम्यान तात्पुरत्या स्वरूपात तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मात्र, हा तीन दिवसांचा विराम म्हणजे युद्ध कायमस्वरूपी थांबण्याची सुरुवात आहे की केवळ राजनैतिक चर्चेसाठी घेतलेले तात्पुरते पाऊल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही देशांमधील संघर्ष आणि महत्त्वाचे राजकीय मतभेद अद्याप कायम आहेत.

ताज्या बातम्या

पालकमंत्री गिरीश महाजन यांची कळवण उपजिल्हा रुग्णालयास भेट

0
नाशिक, दि. ५ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : Nashik कळवण तालुक्यातील आश्रमशाळेमधील काही विद्यार्थी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती घेण्यासाठी...