Wednesday, September 30, 2026
HomeनगरShirdi : साई मंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी

Shirdi : साई मंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त साईबाबा समाधी मंदिरात शुक्रवारी रात्री राजेंद्र पांडुरंग मांडेवाल, सानपाडा, नवी मुंबई यांचे श्रीकृष्णजन्म कीर्तना नंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, पुजारी, कर्मचारी, ग्रामस्थ अमृत गायके, राजेंद्र सुभाष कोते, वैभव कोते, अशोक गायके, संजय शिंदे, अमोल गायके, प्रमोद गोंदकर, तुषार गोंदकर, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

शनिवारी सकाळी 10 वाजता गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त साईबाबा समाधी शताब्दी मंडप स्टेजवर राजेंद्र पांडुरंग मांडेवाल, सानपाडा, नवी मुंबई यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर समाधी मंदिरात साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज अजित प्रकाश कोते यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली.

शनिवारी रात्रौ 9 वाजता गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त साईबाबांच्या पादुकाची रथाची गावातुन मिरवणुक निघाली व रथाची मिरवणुक परत आल्यानंतर शेज आरती संपन्न झाली. साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित केलेला गोकुळाष्टमी उत्सव आनंदमय व भक्तीमय वातावरणात पार पडला. या उत्सवानिमित्त परिसरातील स्थानिक ग्रामस्थ तसेच भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये; राज्य शिक्षण...

0
मुंबई | Mumbai राज्यातील दुष्काळग्रस्त (Drought) २६५ तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक...