Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशसैन्याला मोठं यश! १२ तासांत जैश कमांडर जाहिद वानीसह 5 दहशतवाद्यांचा खात्मा

सैन्याला मोठं यश! १२ तासांत जैश कमांडर जाहिद वानीसह 5 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | Shrinagar

गेल्या 12 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) आणि जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेच्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा कमांडर जाहिद वानीसह (Zahid Wani) एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे…

- Advertisement -

याबाबत काश्मीरच्या आयजीपींनी माहिती दिली आहे. जम्मू आणि काश्मीरचे आयजीपी विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री बडगाम जिल्ह्यातील चरारेश्रीफ आणि पुलवामा जिल्ह्यातील नायरा येथे सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आहे.

यादरम्यान बडगाममध्ये एक आणि पुलवामामध्ये चार दहशतवादी मारले गेले आहेत. जाहिद मंजूर वानी हा जम्मू-काश्मीरमधील जैशच्या प्रमुख केडरपैकी एक होता. 14 फेब्रुवारी 2019 रोजी ज्या लेटपुरा घटनेत 40 हून अधिक CRPF जवान शहीद झाले होते त्यात जाहिदचा सहभाग होता.

दरम्यान, शनिवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. कुलगाम जिल्ह्यात एका पोलिसाच्या हत्येनंतर पुलवामाच्या नायरा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. यावेळी मोठ्या संख्येने लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकांनी घटनास्थळाचा ताबा घेतला होता.

दुसरीकडे शनिवारी संध्याकाळीच कुलगाम जिल्ह्यातील हसनपोरा येथे संशयित दहशतवाद्यांनी हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद गनी यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते हेड कॉन्स्टेबल कुलगाम पोलीस ठाण्यात तैनात होते. पोलीस कर्मचाऱ्याला गोळी झाडल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. त्यानंतर सुरक्षा दलाने ही मोठी कामगिरी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या