Sunday, May 5, 2024
Homeजळगावकेदारनाथ येथे अतिवृष्टीमुळे अडकलेले खान्देशातील 50 भाविक सुखरूप

केदारनाथ येथे अतिवृष्टीमुळे अडकलेले खान्देशातील 50 भाविक सुखरूप

अमळनेर Amalner / प्रतिनिधी

  बारा ज्योतीर्लींगमध्ये (Twelve Jyotirlingas) मूख्य समजल्या जाणाऱ्या “केदारनाथ” (Kedarnath) उत्तराखंड (Uttarakhand) येथे अमळनेर(Amalner) धुळे,(Dhule) जळगाव,( jalgaon) नंदुरबार ( Nandurbar),सह खान्देशातील ५०  भाविक (Passionate) अतिवृष्टीमुळे (Due to heavy rains) गेल्या ३ दिवसांपासून अडकले (Stuck) होते ते आज दि १९ रोजी १८ किमी चा पायी प्रवास करून गौरीकूंड (Gaurikund) येथे सूखरूप परतले आहेत.

- Advertisement -

अमळनेरच्या मॉ गायत्री यात्रा कंपनी तर्फे ४६ प्रवाशी चारधाम यात्रेसाठी दि ७ आँक्टोंबर पासून रवाना झाले होते दि १७ रोजी गौरकूंड येथून केदारनाथला मंदिरात हेलीकॉप्टरने पोहचले मात्र हवामानातील बदलामूळे हेलीकॉप्टर सेवा बंद झाली व मूसळधार पाऊसामूळे रेड अँलर्ट घोषीत झाल्याने सूमारे ६० तासा पेक्षा जास्त वेळ भाविक या ठिकाणी अडकून पडले होते

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेल्या २ वर्षापासून हि यात्रा बंद करण्यात आली होती यावर्षी सालाबादा प्रमाणे अक्षय तृतीयेला मंदिराचे कपाट (द्वार) ऊघडले मात्र न्यायालयाने या यात्रेवर बंदी केली होती मात्र काही नियमावली करून चारधाम यात्रा २० सप्टेंबरला सूरू झाली अमळनेरहून मॉ गायत्री यात्रा कंपनी मार्फत ४६ भाविक आयोजक नरेंद्र सोनार यांचे नेतृत्वात दि ७ला ऊज्जैन आग्रा मथूरा वृंदावन करून हरिद्वार पोहचले दि १३ ला हरिद्वारहून ऊत्तरख़ंडातील चार धाम यात्रेला प्रारंभ झाला गंगोत्री यमूनोत्री केदारनाथ व बद्रीनाथ हे चार धाम असून दि ४ नोव्हेंबरला मंदिर ६ महिन्यांकरिता बंद केले जाते

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव,नासिक नंदुरबार,सूरत येथील भाविकांचा यात समावेश होता या पैकी “केदारनाथ” धाम येथे प्रचंड प्रमाणात पाऊस सूरू झाला, त्यामुळे सर्वत्र मोठ्याप्रमाणात पाणी च पाणी असल्याने व हवामानातील बदलामुळे हवाईदल वाहतूक सुध्दा बंद असल्याने उत्तर महाराष्ट्र राज्यातील सुमारे ५०भाविक तेथे अडकून पडले होते ऊत्तराखंड शासनाकडून करण्यात येणाऱ्या राहूट्या व भोजन व्यवस्था यावर्षी बंद होती बर्फच्छातीत पर्वतमूळे याठिकाणी खाण्या पिण्याची व राहाण्याची फारशी सोय नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली ऊत्तराखंड राज्यातील १३ जिल्ह्यात अतिवृष्टी मूळे भाविक असतील तेथेच थांबण्याचा सल्ला प्रशासनाने दिला होता

केदारनाथ मंदिराजवळ अडकलेल्या भाविकांना भूस्सखलन व बर्फवृष्टीच्या भितीने चहूबाजूला पाणी घनदाट जंगल कडाक्याची थंडी जिओ व्यतीरिक्त कूठल्याही कंपनीची मोबाईलची रेंज नाही अशा मानसिकतेत जिव मूठीत धरून भाविकांनी २ रात्री अडीच दिवस काढले जिवाचा थरकाप होणाऱ्या अवस्थेत आज दि १९ रोजी सर्व भविक घनदाट जंगलातून १८ कि मी अंतर पायी चालून सूखरूप पोहचल्याने कूटूंबियांसह सर्वांना हायसे वाटले

यात्रेचे आयोजक नरेंद्र सोनार यांनी सर्व भाविकांना वेळोवेळी धिर दिला व काळजी घेतली आणी सूखरूपपणे आम्हाला खाली पोहचवले यामूळे आम्ही सर्व भाविक परमेश्वरासह आयजकांचे आभार मानतो

रमेश भास्कर निकूंभ अमळनेर, यात्रेकरू भविक

२५० रूपयात जेवण १ व्यक्तीला राहाण्यासाठा ७०० ते १००० रूपये पाणी बॉटल ५० रू चहा ३० रूपये चमचाभर खिचडी १५० रूपये ५ रूचा बिस्किटचा पूडा २५ रूपयात अशा अवस्थेत भाविकांनी जे मिळेल त्यावर वेळ निभावून घेतली

- Advertisment -

ताज्या बातम्या