नवी दिल्ली | New Delhi
उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) हाथरसमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी (Stampede) होऊन २७ जणांचा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत २३ महिलांसह ३ चिमुकल्यांचा आणि एका व्यक्तीचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एका सत्संगाच्या समारोपाचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ; मात्र, तरीही पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल
यासंदर्भात बोलताना, हाथरसचे पोलीस अधिक्षक राजेश कुमार सिंह म्हणाले, “आम्ही आतापर्यंत २७ जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात (Hospital) पाठवले आहेत. यामध्ये २३ महिला, ३ चिमुकली मुले आणि एका व्यक्तीचा समावेश आहे. तसेच जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात येत असून ही घटना नेमकी कशी घडली, यांसदर्भातील तपास सुरू आहे.
हे देखील वाचा : Vidhan Parishad Election : महायुतीचे टेन्शन वाढले; निवडणुकीत होणार तगडी फाईट
तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला असून अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी (CM) दिल्या आहेत.
हे देखील वाचा : मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे निलंबन; सभागृहात लाड यांना शिवीगाळ करणे भोवले
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सत्संगाच्या मंडपात प्रचंड उकाडा जाणावत होता आणि आर्द्रतेमुळे चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती
हाथरसचे डीएम आशिष कुमार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. जखमींना रुग्णालयात नेले जात आहे आणि जखमींवर उपचार सुरु आहेत. या कार्यक्रमासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी (SDM) परवानगी दिली होती आणि हा एक खाजगी कार्यक्रम होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. दुर्घटनास्थळी शक्य ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचे प्राथमिक लक्ष आहे. जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत कऱण्यात येत आहे”.
व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा