Friday, September 20, 2024
Homeमुख्य बातम्यानरेंद्र मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ; मात्र, तरीही पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल

नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ; मात्र, तरीही पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) संसदेला संबोधित केले. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला.त्यावरून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखा, असे म्हणत विरोधकांना चांगलेच खडसावले. मात्र,गेल्या १५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत बोलणेही मुश्किल झाल्याचे दिसून आले.यावेळी त्यांनी कानाला हेडफोन लावून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाष्य करत दहा वर्षांत त्यांच्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचत विरोधकांवर निशाणा साधला.

यावेळी बोलतांना मोदी म्हणाले की, गेल्या १० वर्षात आमचे सरकार ‘सबका साथ,सबका विकास’ या मंत्रावर काम करत आली असून २५ कोटी जनतेला आम्ही गरिबीतून मुक्त केले आहे. आमच्या सरकारने तुष्टीकरणावर नाही तर संतुष्टीकरणावर काम केले. त्यामुळे देशाच्या १४० कोटी जनतेने आमचे १० वर्षाचे काम पाहून संधी दिली आहे. या निवडणूकीत भारतातील जनतेने विवेकतेने मतदान केले. आम्ही विकसित भारतासाठी जनतेचा आशिर्वाद मागितला होता. विकसित देश झाला तर देशातील जनतेचे स्वप्न पूर्ण होतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना म्हटले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, काल आणि आज अनेक खासदारांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपले मत व्यक्त केले आहे, विशेषत:जे पहिल्यांदाच खासदार म्हणून आले आहेत. त्यांनी संसदेच्या सर्व नियमांचे पालन केले आणि त्यांचे वर्तन कौतुकास्पद होते. पहिल्यांदाच खासदार असूनही त्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली आहे आणि त्यांच्या मतांनी चर्चेला अधिक मौल्यवान बनवले आहे, असे त्यांनी म्हटले.

मोदींचा काँग्रेसवर निशाणा

दरम्यान, विरोधकांनी गोंधळ घातलेला असतानाही मोदींनी काँग्रेसविरोधात जोरदार भाषण केले. काँग्रेस गेल्या तीन निवडणुकांमध्येही १०० जागाही निवडून येऊ शकली नाही. त्यांनी पराभव स्वीकारून आत्मचिंतन केले असते तर चांगले असते. पण ते शीर्सासन करत आहेत. काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम दिवसरात्र वीज चालवून भारताच्या नागरिकांच्या मनात हे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांनी आम्हाला हरवले आहे, असे मोदींनी कॉंग्रेसवर बोलतांना म्हटले.

एक काळ होता जेव्हा देशात जास्त घोटाळे व्हायचे

एक काळ होता जेव्हा देशात जास्त घोटाळे व्हायचे. पंरतु, आमच्या सरकारने हे घोटाळे कमी करण्याचे काम गेल्या १० वर्षांत केले आहे. कोळसा घोटाळ्यात अनेकांचे हात काळे झाले होते. आज कोळशाचे सर्वाधिक उत्पादनाचे विक्रम आपण केले आहेत. आता देश म्हणतोय की आपण काहीही करु शकतो. एक काळ असा होता २०१४ च्या आधी फोन बँकिंग करुन बँक घोटाळे करण्यात आले. बँकेची संपत्ती व्यक्तिगत प्ऱॉपर्टी म्हणून लुटण्यात आला. आम्ही २०१४ नंतर ही धोरणं बदलली. त्यामुळेच आपल्या देशांचे नाव जगातल्या प्रसिद्ध बँकांमध्ये घेतले जाऊ लागले असे नरेंद्र मोदी म्हणाले.

२०१४ च्या आधी निर्दोश लोकं मारली जात होती, आता भारत घरात घुसून मारतो

२०१४ च्या आधी निर्दोश लोकं मारली जात होती. सरकार गप्प बसून असायची. आता आम्ही घरात घुसून मारतो. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करतो. दहशतवाद्यांना ही उत्तर देतो. देशातील प्रत्येक नागरिकाला आता माहित आहे की, भारत आपल्या सुरक्षेसाठी काहीही करु शकतो. ३७० कलम लागू असताना दगडफेक व्हायची, लोकं म्हणायचे जम्मू-काश्मीरचं काही होऊ शकत नाही. आता भारताच्या संविधानावर विश्वास ठेवत लोकं येथे मतदान करत आहेत, असे मोदींनी म्हटले.

लोकसभा अध्यक्ष राहुल गांधींवर भडकले

विरोधकांची घोषणाबाजी थांबत नसल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोदींना मध्येच थांबवले. यानंतर ते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर चांगलेच भडकले.विरोधी पक्षनेते तुम्हाला हे शोभा देत नाही. संसदीय परंपरेनुसार हे योग्य नाही. हे असे चालणार नाही. संसदेची मर्यादा राखा,व्हेलमध्ये येण्यासाठी तुम्ही सदस्यांना सांगता, ही खूप चुकीची पध्दत आहे,असे म्हणत लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांना खडसावले.

- Advertisment -

ताज्या बातम्या