Friday, May 3, 2024
Homeनाशिककोरोना : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिमतीला संघाचे स्वयंसेवक; ५० जणांची टिम कार्यरत

कोरोना : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिमतीला संघाचे स्वयंसेवक; ५० जणांची टिम कार्यरत

नाशिक । दि.३० प्रतिनिधी

करोना व्हायरसची लक्षणे नागरीकांमध्ये दिसून येत असल्याने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात गर्दी होत आहे. ही गर्दी नियंत्रणासाठी रुग्णालयाच्या हाकेला साद देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ४० ते ५० जणांची तुकडी या ठिकाणी सोशल डिस्टन्सीबाबत जनजागृती करत आहे. रुग्णांना मास्क वाटप व काही रुग्णांसाठी जेवणाचे डब्बे पुरवणे ही सेवा देण्याचे काम ते करत आहेत.

- Advertisement -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ५०-६० स्वयंसेवकानी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मदत करण्यास सुरुवात केली आहे. संघ स्वयंसेवकांनी मदत करावी असे आवाहन जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केले होते, या स्वयंसेवकांची दोन तुकड्यात विभागणी करण्यात आली आहे.

एक तुकडी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळात आणि दुसरी तुकडी दुपारी ३ ते रात्री ९ या वेळात काम करते आहे. जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे यांनी स्वयंसेवकांना काम कसे करायचे याचे मार्गदर्शन केले.  

सर्व  स्वयंसेवकांना घरापासून येण्याची सुविधा देण्यात आली आहे. रुग्णालयात काम करण्यासाठी आवश्यक ते ओळखपत्र व सुरक्षिततेची साधने पुरवण्यात आली आहेत. 

या कामासाठी समाजातील इतर बऱ्याच संस्था जसे जाणता राजा स्पोर्ट्स क्लब सहभागी झाल्या आहेत. अमोल जोशी, जयेश क्षेमकल्याणी, अभय फडके, मिलिंद साबळे, प्रांजल देव, रोशन  येवले , योगेंद्र घरटे, निलेश पवार , सुहास धामणे  आदी कायर्कर्ते नियोजन करत आहेत. 

स्वयंसेवक या जबाबदाऱ्या पार पाडणार

१. रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाबाबत समोपदेशन करणे.
२.मास्क वापरण्यास प्रोत्साहन देणे व सक्ती करणे.
३. सामाजिक अंतर राखण्यासाठी आग्रह धरणे व लोकांमध्ये आवश्यक ते अंतर करवून घेणे.
४. बऱ्याच समाजसेवी संस्था, रुग्णांच्या नातेवाइकांची भोजनाची सोय करत आहेत.  त्याठिकाणी  सामाजिक अंतर राखण्याची जाणीव करून देणे. ५, रुग्णालयाच्या  प्रवेशद्वारावर, पोर्च मध्ये, वाहनतळावर, तपासणी कक्ष येथे  गरज पडेल तशी मदत. अशी अनेक कामे स्वयंसेवक करत आहेत.
- Advertisment -

ताज्या बातम्या