- Advertisement -
मुंबई । प्रतिनिधी Mumbai
विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या एक हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.
दंडाशिवाय अशारितीने तोडलेले कोणतेही झाड आणि ते वाहून नेण्यासाठी वापरलेली हत्त्यारे, नौका, वाहने सरकारजमा करण्यात येतील. या संदर्भातील दुरुस्ती महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ मधील कलम ४ मध्ये करण्यात येऊन अध्यादेश काढण्यात येणार आहे.