Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPune News: पुणं हादरलं! राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या छळाला कंटाळून एकाची आत्महत्या; ३०...

Pune News: पुणं हादरलं! राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या छळाला कंटाळून एकाची आत्महत्या; ३० पानांची सुसाईड नोट, हातावर नावं लिहिली

पुणे | Pune
पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच एका खळबळजनक घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हडपसर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार फारुख शेख यांच्या त्रासाला कंटाळून एका ५६ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. सादिक उर्फ बाबू कपूर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ऐन महापालिका निवडणुकीच्या काळात पुण्यातील हडपसरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ५६ वर्षीय सादिक यांनी हडपसरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार त्रास देत असल्याचा आरोप करत आत्महत्या केलीय. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

नेमकी घटना काय आहे?
सादिक उर्फ बाबू कपूर यांनी त्यांच्या कार्यालयात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या तपासात सादिक यांनी मरण्यापूर्वी आपल्या हाताच्या पंजावर काही नावे लिहिली होती, तसेच घटनास्थळावरून ३० पानांची सविस्तर सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूचे कारण आणि त्यासाठी कारणीभूत असलेल्या व्यक्तींचा सविस्तर उल्लेख केला आहे.

YouTube video player

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील सय्यद नगर भागातील पाच गुंठे जमिनीवरून सादिक कपूर आणि संबंधित व्यक्तींमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता. या वादातूनच कपूर यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. लष्कर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्यांनी सुसाईड नोट जप्त केली आहे. “फारुख शेख यांच्या त्रासाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे,” असे सादिक यांनी नमूद केल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केलेले सादिक कपूर यांच्यावर यापूर्वी ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. एका बाजूला गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि दुसऱ्या बाजूला थेट निवडणुकीतील उमेदवाराचे नाव आत्महत्येशी जोडले गेल्याने, या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...