Wednesday, January 7, 2026
Homeमुख्य बातम्याNaxal Leader Bhupati : माओवादी नेता भूपतीसह ६० जणांचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसर्मपण

Naxal Leader Bhupati : माओवादी नेता भूपतीसह ६० जणांचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसर्मपण

मुंबई | Mumbai

गडचिरोलीतील सेंट्रल कमिटी तसेच पॉलिट ब्युरो सदस्य आणि अत्यंत वरिष्ठ नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर (Gadchiroli Police) आत्मसर्मपण केले आहे. यामुळे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांचा कणा मोडण्यात मोठे यश आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा आत्मसमर्पण कार्यक्रम आज गडचिरोलीत पार पडला. यावेळी शरणागती पत्करणाऱ्या माओवाद्यांनी त्यांचे शस्त्र मुख्यमंत्र्यांना सोपवली आहे.

- Advertisement -

माओवादी भूपतीवर सहा कोटींचे बक्षीस होते. भूपती हा नक्षलवादी संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा नेता होता. १९७० च्या दशकात माओवादी संघटना पीपल्स वॉर ग्रुपमध्ये प्रवेश करणारा भूपतीची कारकिर्द गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सुरू झाली. भूपती हा नक्षलवादी नेता मल्लोजुला कोटेश्वरराव उर्फ किशनचा छोटा भाऊ आहे. नक्षलवाद्यांच्या संघटनेतील बौद्धिक चेहरा म्हणून भूपती हा प्रसिद्ध होता. त्याने आतापर्यंत घडलेल्या अनेक हिंसक घटनांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. खासकरून नक्षलवाद्यांच्या संघटनेची स्थानिक पातळीपासून केंद्रीय समितीपर्यंत आखणी करण्यात त्याने मोठी भूमिका बजावली आहे.

YouTube video player

दरम्यान, १९८० पासून गडचिरोलीत सुरू झालेल्या माओवाद सशस्त्र चळवळीत आजवर माओवाद्यांनी ५३८ सामान्य नागरिकांचे जीव घेतले आहे. अशातच ‘सशस्त्र माओवादाचा मार्ग सोडून सरकारसोबत शांतता वार्ता करून मुख्य प्रवाहात यावे’, अशी भूमिका माओवादी नेता सोनू उर्फ भूपतीने मांडली होती. त्यानंतर आता त्याच्यासह ६० हून अधिक सहकाऱ्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर (Gadchiroli Police) आत्मसर्मपण केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे.

कोण आहे भूपती?

मल्लोजुला वेणुगोपाल हा भूपती किंवा सोनू या नावानेही ओळखला जातो. गेली ४० वर्षे नक्षलवादी संघटनेच्या विस्तारासाठी सक्रिय असलेला भूपती हा केंद्रीय समिती आणि पोलिट ब्युरो सदस्यही होता. त्याच्यावर विविध राज्यांमध्ये मिळून १० कोटींपेक्षाही अधिकचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. त्याचे बीकॉमपर्यंतचे शिक्षण झाले असून नक्षलवादी चळवळीतला जहाल नेता अशी त्याची ओळख आहे. तो महाराष्ट्र–छत्तीसगड सीमावर्ती माड डिव्हिजनमध्ये सक्रिय होता. गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश अशा राज्यांची जबाबदारी त्याच्याकडे होती.

ताज्या बातम्या

Ridhima Pathak : ‘देश आधी, लीग नंतर!’ भारतीय प्रेझेंटर रिद्धिमा पाठकची...

0
दिल्ली । Delhi भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण वळणावर आहेत. राजकारण आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांत दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र होताना...