Sunday, September 8, 2024
Homeदेश विदेशधक्कादायक! भूस्खलनामुळे दोन बस नदीत कोसळल्या, ६३ प्रवासी बेपत्ता

धक्कादायक! भूस्खलनामुळे दोन बस नदीत कोसळल्या, ६३ प्रवासी बेपत्ता

दिल्ली । Delhi

नेपाळमध्ये भूस्खलनामुळे (Nepal Landslide) भीषण दुर्घटना घडली आहे. भूस्खलनमुळे २ बस नेपाळमधील त्रिशूली नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या. या बसमध्ये किमान ६३ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळमधील चितवन जिल्ह्यातील नारायणघाट-मुगलिंग मार्गावरील सिमलताल परिसरात पहाटे ३.३० च्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

चितवनचे जिल्हाधिकारी इंद्रदेव यादव यांनी आम्ही घटनास्थळी असून शोधकार्य सुरु असल्याचे सांगितले. इंद्रदेव यादव यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार दोन्ही बसमध्ये चालकांसह एकूण ६३ जण प्रवास करत होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. आम्ही घटनास्थळी आहोत आणि शोध मोहीम सुरू आहे. सततच्या पावसामुळे बेपत्ता बसेसचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. भूस्खलनाच्या ढिगाऱ्यांमुळे नारायणघाट-मुगलिंग मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे, असेही ते म्हणाले.

हे देखील वाचा :  उभ्या असलेल्या कंटेनरवर कार जाऊन धडकल्याने भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

या घटनेत अनेकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये अनेक भारतीयांचाही समावेश आहे. मान्सूनच्या आपत्तींमुळे नेपाळमध्ये एका दशकात १८०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या काळात सुमारे ४०० लोक बेपत्ता झाले आणि १५०० हून अधिक लोक आपत्तीत जखमी झाले.

दरम्यान नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मदत आणि बचाव कार्य पूर्ण क्षमतेनं करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ‘नारायणघाट-मुगलिंग मार्गावर सिमल्टारमध्ये भूस्खलन होऊन जवळपास ६० प्रवासी बेपत्ता झाले आहेत. देशाच्या विविध भागांमध्ये घडलेल्या दुर्घटनांमुळे मला अतिव दु:ख झालं आहे. गृह प्रशासनासह सर्व सरकारी विभागांना बेपत्ता प्रवाशांना शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ असं दहल यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या