Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक पुन्हा हादरले! ६५ वर्षीय वृद्धाचा खून

नाशिक पुन्हा हादरले! ६५ वर्षीय वृद्धाचा खून

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉईंट येथे एका ६५ वर्षीय वृद्धाचा खून झाल्याची घटना घडली आहे. बच्चू सदाशिव करडेल असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे…

- Advertisement -

करडेल यांच्या चुलत भावाच्या मुलाची हळद समारंभ असल्यामुळे घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते. बच्चू करडेल हे घरात एकटेच असताना अज्ञाताने त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने मारले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अज्ञाताने करडेल यांच्या घरातील सुमारे सहा ते सात लाखांची रोकड असलेली कोठी अज्ञाताने लंपास केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. मात्र चोराला जर करडेल यांची हत्या करायची होती तर त्याला कोठीचे कुलुप तोडणे शक्य का झाले नाही? तसेच तो पैशांनी भरलेली कोठी का घेऊन गेला? यावरून संशय व्यक्त केला जात असल्याने पोलिसांचा तपास आता कुठल्या दिशेने सुरू आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महिलांनी कपडे घातले नाही तरी…; रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, घटनेची माहिती समजताच परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ, मध्यवर्ती गुन्हे शाखा वरिष्ठ निरीक्षक आंचल मुदगल, सहाय्यक निरीक्षक किशोर कोल्हे, उपनिरीक्षक संदीप पवार यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या