Thursday, November 21, 2024
HomeमनोरंजनNational Film Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा! 'वाळवी' ठरला सर्वोकृष्ट मराठी...

National Film Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा! ‘वाळवी’ ठरला सर्वोकृष्ट मराठी सिनेमा… संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर

मुंबई । Mumbai

प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांची (National Film Awards) घोषणा आज करण्यात आली आहे. यंदाचे हे या पुरस्कारांचं ७० वं वर्ष आहे.

- Advertisement -

गेल्या एका वर्षात अनेक दमदार सिनेमांनी , कलाकरांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या पुरस्कारांवर कोणाचं नाव कोरलं जाणार याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

या पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन असलेल्या वाळवी (Vaalvi) सिनेमाला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तसेच साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ला बेस्ट डॉक्यु्मेंटरी आणि बेस्ट नॅरेशन असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.

तसेच सचिन सुर्यवंशी यांच्या वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर आदीगुंजन या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम निवेदन पुरस्कार, सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

वाळवी हा सिनेमा १३ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, अनिता दाते, सुबोध भावे अशी या सिनेमाची स्टारकास्ट होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या