Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात ७५ अमृत सरोवर उभारणार; डॉ. भारती पवारांची माहिती

जिल्ह्यात ७५ अमृत सरोवर उभारणार; डॉ. भारती पवारांची माहिती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आपण आझादी का अमृत महोत्सव (Azadi Ka Amrut Mahotsav) साजरा करत आहोत. या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून आपण जिल्ह्यात ७५ अमृत सरोवर उभारत आहोत…

- Advertisement -

यापैकी ५० सरोवरांची ठिकाणे अंतिम करण्यात आली आहे. याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) माध्यमातून होणार आहे तर उरलेली २५ सरोवरांची ठिकाणे वनविभागाकडून (Forest Department) येणार आहेत. त्यानंतर ती अंतिम करण्यात येतील; अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री पवार म्हणाल्या की, जिल्ह्यात अपघातांचे (Accident) प्रमाण वाढत आहे. राज्यात पहिल्या काही जिल्ह्यांमध्ये नाशिकचा (Nashik) समावेश आहे. हे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्राधान्याने काही उपाययोजना करणे आवश्यक आहेत.

आता आपण जिल्ह्यातील १३० ब्लक स्पॉट निवडले आहेत. याठिकाणी वेळोवेळी जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच स्पीड लिमिट, फ्लाय ओव्हर असे मोठ्या प्रमाणावर नियोजन केले जाईल.

सर्व नाशिककरांनी हेल्मेट (Helmet) घालावे, हायवेवर वेग मर्यादा पाळाव्यात. अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे ही चिंतेची बाब आहे. या बाबतीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वाहतूक विभाग यांनी एक समिती नेमावी आणि त्यावर काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

महावितरणच्या (Mahavitaran) बाबतीत बोलताना, सध्या शेतकऱ्यांची पूर्व मान्सूनची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. आज जिल्ह्यात जवळपास 600 ट्रान्सफॉर्मर दिलेले नाही, तात्काळ यावर शेतकऱ्यांना मदत करा. त्यांची थकबाकी असेल तरी द्या, त्यांची कामे थांबायला नको. पूर्व मान्सूनच्या कामांना आता विजेची आवश्यकता असणार आहे. शेतकऱ्यांना आता बियाणे पुरवठा व्हायला हवा, खत उपलब्ध झाल्यावर ते तत्काळ उपलब्ध करून द्यावे; शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, काळाबाजार करू नये, साठेबाणांवर कारवाई करावी, या देखील सूचना पवार यांनी दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या