Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAccident : ट्रॅक्टर दरीत कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Accident : ट्रॅक्टर दरीत कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

जुनी बेज | वार्ताहर

- Advertisement -

कळवण रस्त्यावर कळवण कडून कांदा विक्री करून घरी येताना जायबारी घाटात २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळून जोरण येथील तरुण शेतकरी कुणाल सुभाष सावकार (२४) याचा ट्रॅक्टर खाली दबून जागीच मृत्यू झाला आहे.

कळवण येथे जोरण येथून कांदा विक्री करण्यासाठी जॉनी डियर ट्रॅक्टरने सदर तरुण गेला होता. तिकडून परत येत असताना घरचे कुणाल सावकारला कॉल करत होते, परंतु काही वेळ रिंग वाजली व नतंर रात्री १० नतंर फोन बंद लागत असल्याने घरच्यांना भीती वाटायला लागली. तरी देखील घरचे फोन करत राहिले पण फोन बंदच येत राहिला. एक तास उलटला दोन तास उलटला तरीही कुणाल घरी परतत नव्हता व त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. शेवटी कुणालच्या घरच्यांनी डागसौदाने पासून कळलं पर्यंत रात्री दोन वाजेपर्यंत शोध घेतला त्यांना कुणाल व ट्रॅक्टर मिळून आले नाही.

सकाळी नऊ दहा वाजता सदर ट्रॅक्टर जायभारी घाटात खोल दरीत गेलेला आढळला व त्या ठिकाणी कुणाल ट्रॅक्टर खाली दबलेला आढळला. त्या ठिकाणी नातेवाईकांनी कुणाला पाहुन हंबरडा फोडला व कळवण पोलिसात तक्रार दाखल करून पंचनामा करून पुढील तपास कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, पो. हवालदार शेवाळे, पो शिपाई चौधरी, शिपाई शेवाळे हे करीत आहेत. मयत कुणालचे सात ते आठ महिन्यापूर्वी विवाह झालेला होता. पुढील भविष्याचे चांगले स्वप्न रंगवत असतानाच कुणालचा असा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने जोरणसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Kolkata Tragedy : कोलकाता दुर्गापूजा मंडप दुर्घटनेतील मृतांचा आकडा १९ वर;...

0
कोलकाता | Kolkata पश्चिम बंगालमधील (West Bengal) कोलकाता (Kolkata) येथील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात (Durga Puja Mandp) शनिवारी (१७ ऑक्टोबर) संध्याकाळी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत १९...