Friday, May 3, 2024
Homeनाशिकयेवला तालुक्यात करोनामुळे आतापर्यंत ८१ मृत्यू

येवला तालुक्यात करोनामुळे आतापर्यंत ८१ मृत्यू

येवला । Yeola

वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच करोनामुळे मृत्यूची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गेल्या एका वर्षात मृत्यूचा आकडा 81 वर पोहोचला आहे.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात नाशिक मालेगाव नंतर येवल्याचा क्रमांक लागला होता. यावेळी मात्र रुग्ण रुग्णसंख्येचा वेग इतर तालुक्याच्या तुलनेत कमी असला तरी, वाढणारे रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येमुळे नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे. ग्रामीण रुग्णालयात कोवीड केअर सेंटर सुरू झाले असून, येथे मृत्यूच्या घटना घडत आहे.

काही खासगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेत असल्याने, नेमका आकडा पुढे येत नाही. ही संख्या रोजच तीन अंकात जात असल्याचा अंदाज आहे. तालुक्यातील करोनाबाधित एकूण मृत्यूची संख्या 81 झाली आहे. मंगळवारी तालुक्यातील 56 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील सक्रिय बाधितांची संख्या312 झाल्याची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी राजेंद्र खैरे यांनी दिली.

आज एकुण 2 हजार 302 बाधीत असुन, त्यापैकी एकुण 1 हजार 909 बाधितांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत एकुण 312 जण करोनावर उपचार घेत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या