Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यापीएफ खात्यावर 8.5 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय

पीएफ खात्यावर 8.5 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय

नवी दिल्ली – New Delhi

दिवाळ सणापूर्वी देशभरातील जवळपास सहा कोटी पीएफ (provident fund)सभासदांसाठी आनंदाची बातमी आहे. अर्थ मंत्रालयाने २०२०-२१ या वर्षाकरिता पीएफ रकमेवर ८.५ टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. लवकरच सभासदांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. ईपीएफ मंडळाने (EPFO Board) व्याजदर ८.५ ठेवण्याची शिफारस केली होती. ती अर्थ मंत्रालयाने मंजूर केली.

- Advertisement -

पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्या तिघांना अटक

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘ईपीएफओ’ने दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्यासाठी प्रयत्न केले होते. २०१९-२० या वर्षासाठी पीएफवर ८.५ टक्के व्याजदर मंजूर करण्यात आला होते. हाच व्याजदर २०२०-२१मध्ये कायम ठेवण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या