दिल्ली । Delhi
रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण लढाई सुरु आहे. युक्रेनने रशियावर एक मोठा हल्ला केला आहे. नुकतेच युक्रेन सैन्याने पुन्हा एकदा रशियाच्या कुस्के क्षेत्राला निशाणा बनवत येथे हल्ला चढवला. अमेरिकन निर्मित HIMATS ड्रोनने हा हल्ला चढवल्याची माहिती रशियाने दिली आहे.
युक्रेनने रशियावर 9/11 सारखा भीषण हल्ला केला आहे. कजान शहरातील बहुमजली इमारतीवर हा ड्रोन हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात इमारतीला भीषण आग लागली आहे. कजान शहरातील बहुमजली इमारतीवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर रशियन नागरिक हादरले आहेत. या हल्ल्ल्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे रशियाकडून सांगण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, युक्रेनी सैन्याने 8 ड्रोन्सनी 6 इमारतींना लक्ष्य केलं आहे. कामलेव एवेन्यू, क्लारा जेटकिन स्ट्रीट, युकोजिंस्काया, खादी तक्ताश आणि क्रास्नाया पॉजित्सिया या इमारतींना जाऊन ड्रोन्सनी धडक दिली. दोन अन्य ड्रोन्सनी ऑरेनबर्गस्की ट्रॅक्ट स्ट्रीटवरील घराला लक्ष्य बनवलं आहे. या हल्ल्यात कोणाचा मृत्यू किंवा कोणी जखमी झाल्याच वृत्त नाहीय. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हल्ला झालेल्या ठिकाणाहून सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे.