Tuesday, October 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक होणार

अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक होणार

टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड सोबत सामंजस्य करार; ४२०० मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प

- Advertisement -

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

वीज निर्मिती क्षेत्रातील टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड या दोन कंपन्या राज्यात अणुवीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही कंपन्यांकडून ४ हजार २०० मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी ७९ हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला.

राज्याची स्वच्छ ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेच्या वापरात राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. अणुऊर्जा हा सक्षम आणि महत्त्वाचा पर्याय म्हणून पुढे आला आहे. या नवीन ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीमुळे अणुऊर्जेच्या निर्मिती क्षमतेत मोठी वाढ शक्य होईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

देशात विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी अणुभट्ट्या तसेच थोरियम आधारित तंत्रज्ञानाच्या चाचण्यांमुळे अणुऊर्जा क्षेत्रात नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. हे क्षेत्र उदयोन्मुख असून या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या प्रवासात राज्य सरकार सहप्रवासी म्हणून पूर्ण सहकार्य करेल. टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड सोबत झालेल्या या दोन करारांमुळे महाराष्ट्राच्या अणुऊर्जा निर्मिती क्षमतेला आणखी बळ मिळणार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडचे अभिनंदन केले.

यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर, आमदार अभिमन्यू पवार, ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महापारेषणचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार तसेच महाजनकोचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्णन बी., तसेच टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आम्ही संख्याबळ वाढवणार, एकनाथ शिंदेंना…; प्रताप सरनाईकांच्या विधानाची जोरदार चर्चा

0
मुंबई । Mumbai शिवसेनेचा (शिंदे गट) दसरा मेळावा आज मुंबईतील नेस्को सेंटर येथे पार पडणार आहे. एकीकडे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू असतानाच,...