Thursday, May 2, 2024
Homeनाशिकआधीच हौस त्यात पडला पाऊस

आधीच हौस त्यात पडला पाऊस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न या उक्तीची पावलोपावली आठवण यंदाच्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 94th Marathi Literary Convention निमित्ताने येत आहे.गेल्या मार्चमध्ये हे संमेलन होणार होते.मात्र त्याचवेळी करोनाच्या दुसर्‍या लाटेने डोके वर काढले. त्यामुळे सव मेहनतीवर पाणी फेरले जाऊन समेलन स्थगित करण्याचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी औरंगाबादेत जाहीर केला.

- Advertisement -

त्यानंतर ते कधी होईल याबाबत साशंकता होती.संंमेेलन नाशिकला व्हावे यासाठी लोक हितवादी मंडळ सातत्याने प्रयत्नशील होते. साहित्य रसिकांंनाही त्यांची उत्कंंठा होती.त्यानंंतर सात महिने करोना आटोक्यात येण्याची प्रतीक्षा करावी लागली. करोना आटोक्यात येताच स्वागताध्यक्ष पालंकमंत्री छगन भुजबळ यानी गेल्या महिन्यात साहित्य संमेलन ङ्गकुसुमाग्रज नगरीफ, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव नाशिक येथे दि. 3, 4 व 5 डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर केले.

समेलन अभूतपर्व करण्याचा संकल्प सोडत असतांनाच जय्यत तयारी सुरु झाली. मात्र पुन्हा ओमायक्रॉनचे सावट परसले. त्याचा मुकाबला होत नाही तोच पावसाने डोके वर काढले. ऊन,वारा, पावसापासून ंसंरक्षण करण्याची संंयोजकांंची तयारी असली तरी या बिघडलेल्या वातावरणामुळे रसिक संमेलन स्थळापर्यंंत येऊ शकतील का?हा प्रश्न निर्माण झाला आहे.कारण अजून चार डिसेंबरपर्यंंत ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने weather department स्पष्ट केले आहे.

संमेलनाच्या उदघाटना पासून ते दुसर्‍या दिवसापर्यंंत जर वातावरणच खराब राहिले तर वयोवृध्द साहित्यिकांना अडचणीच येतील.त्यामुळे नाशिकच्या साहित्य संमेलनाला सुरवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला आहे.ते उद्घाटनापर्यंत कायम आहे. आज दि.2 डिसेबर रोजी सायंंकाळी सलील कुलकणी व संदीप खरे यांंचा संमेंलनपूर्व कार्यक्रम आहे.त्यावेळी लाभणारी उपस्थिती व त्यांला मिळणार्‍या प्रतिसादातूनच पुढील ंसमेलनाची दिशा स्पष्ट होईल. हे संमेेलन निर्वीघ्न पार पडाव, अशी समस्त नाशिककरांंची मनापासून इच्छा आहे. मात्र निसर्ग संयोजकांची चांगली परीक्षा पाहत आहे. म्हणूनच आधीच हौस त्यात पडला पाऊस असे म्हटले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या