Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo : नाशिक जिल्ह्यात ९९५ मिमी पाऊस कोसळला ; नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग

Video : नाशिक जिल्ह्यात ९९५ मिमी पाऊस कोसळला ; नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग

नाशिक । प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या पावसाने शहरासह नाशिक जिल्ह्याला धुवून काढले. बुधवारी चक्रिवादळाने जिल्ह्याला धडक दिली. परिणामी जिल्ह्यात ९९५ मिली मीटर इतका तुफान पाऊस कोसळला. सर्वाधिक पाऊस सिन्नर तालुक्यात १११ तर त्या खालोखाल इगतपुरी तालुक्यात १०६ मिली मीटर इतका पाऊस झाला. पावसाचा जोर बघता नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून रात्रभर विसर्ग सुरु होता. दरम्यान गुरुवारी (दि.४) शहर व जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु होता.

- Advertisement -

जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होण्यास अजून अवकाश असला तरी निसर्ग चक्रीवादळाच्या पावसाने जिल्ह्यात कहर केला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने निसर्ग चक्रीवादळ कोकण व मुंबईला धडकले. तेथून शहापूर, कसारामार्गे ते नाशिकला धडकले. परिणामी शहरासह जिल्ह्यात आकाश गच्च काळया ढगांनी भरले होते. ३० ते ४० ताशी वाहणारा सोसाटयाचा वारा वाहत होता.

सोबतीला धुवाधार पावसाने होता. सकाळी पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र, जसेजसे तुफान नाशिककडे सरकले तसातसा पावसाचा जोर वाढला. जिल्ह्याला झोडपले. रात्री तुफान पावसाने कहर केला. इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांमधे शंभर मिलीमीटर पेक्षा जादा पावसाची नोंद झाली. तर संपूर्ण जिल्ह्यात ९९५ मिली मीटर पाऊस पडला.

नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग

मागील आठवडयात नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यात ९९ टक्के जलसाठा होता. जोरदार पावसामुळे गोदा व दारणेच्या पाणी पातळित वाढ होत होती. पाण्याची आवक वाढत असल्याने नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत विसर्ग सुरु होता.

वेळ विसर्ग

सकाळी ६ वाजता २० हजार ४७४
सकाळी ७ वाजता १९ हजार २८७
सकाळी ९ वाजता ७ हजार ६९७
सकाळि १० वाजता ३ हजार १५५
सकाळी ११ वाजता  १ हजार ६१४

तालुकानिहाय पाऊस ( मिमी)

नाशिक – ६४
ईगतपुरी – १०६
दिंडोरी – ७०
पेठ – २८
त्र्यंबकेश्वर – ३८
मालेगाव – ७२
नांदगाव – २७
चांदवड – ५९
कळवण – ७१
बागलाण – ८७
सुरगाणा – ६५
देवळा – ८७
निफाड – ५७
सिन्नर – १११
येवला – ५३

- Advertisment -

ताज्या बातम्या