Thursday, May 9, 2024
Homeनगरवैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींवर हल्ला केल्यास कडक कारवाई

वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींवर हल्ला केल्यास कडक कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना रूग्णांवर उपचार सुरू असताना रुग्णाचा मृत्यू झाल्यास काही नातेवाईकांकडून डॉक्टर, कर्मचार्‍यांना मारहाण करून रुग्णालयाची तोडफोड केल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. असे कृत्य करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना जास्तीतजास्त शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचा इशाराच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला.

- Advertisement -

वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांवर हल्ला झाल्यास त्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन अधीक्षक पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात करोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी सर्वच डॉक्टर, त्यांचे कर्मचारी काम करत आहे. आतापर्यंत अनेक रूग्णांना त्यांनी जीवदान दिले आहे. मात्र, दुर्दैवाने यात काहींचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून डॉक्टर व त्यांचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहे. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यावर हल्ले झाले आहेत. रूग्णाला पूर्ण बरे करण्यासाठी डॉक्टर काम करत असतात. परंतु काही वेळा त्यांना यश येत नाही. अशा वेळी त्यांच्यावर हल्ला करणे चुकूचे असून असे कृत्य करणार्‍यांवर कडक कारवाईचा इशारा अधीक्षक पाटील यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या