Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशIMA चा बाबा रामदेव यांना दणका!

IMA चा बाबा रामदेव यांना दणका!

दिल्ली | Delhi

करोनाच्या काळात एकीकडे करोनाग्रस्तांना मदत करणा-यांची संख्य़ा वाढत आहे तसेच दुसरीकडे वेगवेगळ्या कारणांवरुन बेताल वक्तव्य करणारेही काही कमी नाहीत. अलीकडेच प्रसिध्द योगगुरु रामदेव बाबा यांनी अ‍ॅलोपॅथी औषधांमुळे कोरोना झालेले पेशंट मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडत असल्याचे धक्कादायक विधान केले होते.

- Advertisement -

दरम्यान, अ‍ॅलोपॅथी डॉक्टर आणि उपचारा संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे बाबा रामदेव यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल झाला आहे. १५ दिवसांत माफी मागा अन्यथा १ हजार कोटींची भरपाई द्या अशी भूमिका इंडियन मेडिकल असोसिएनकडून (IMA) घेण्यात आली आहे. बाबा रामदेव यांना अब्रुनुकसानीची ही नोटीस आयएमएच्या उत्तराखंड डिव्हिजनकडून पाठवण्यात आली आहे.

आयएमए उत्तराखंडचे प्रदेश सचिव डॉ. अजय खन्ना यांच्याकडून मंगळवारी रामदेव यांना सहा पानांची नोटीस धाडण्यात आलीय. रामदेव यांच्या वक्तव्यामुळे आयएमए उत्तराखंडशी निगडीत दोन हजार सदस्यांची मानहानी झाल्याचं, त्यांनी या नोटिशीत म्हटलंय. एका डॉक्टर सदस्याच्या मानहानिसाठी ५० लाख यानुसार एकूण एक हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा उल्लेख IMA नं आपल्या नोटिशीत केला आहे.

बाबा रामदेव यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओतून त्यांनी अ‍ॅलोपॅथी उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्याखेरीज त्यांच्यावर एफआयआरही दाखल करण्यात येईल, असंही खन्ना यांनी म्हटलं आहे.

सोबतच ही नोटीस मिळाल्यानंतर ७६ तासांच्या आत करोनावर रामबाण उपाय म्हणून प्रचार केल्या जाणाऱ्या ‘कोरोनिल’च्या सगळ्या भ्रम निर्माण करणाऱ्या जाहिराती सगळ्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात याव्यात, अशीही मागणी IMA नं केली आहे.

काय आहे बाबा रामदेव यांचे वक्तव्य?

रेमडेसिवीर, अँटीबायोटिक, प्लाझ्मा थेरपीवर बॅन आले, फॅव्ही फ्लू हे सगळ अपयशी ठरत आहे. तापाच कोणतही औषध उपयुक्त ठरत नाही. त्या व्हायरस, बॅक्टेरियाला, फंगसला ज्या कारणाने संसर्ग होत आहे त्यावर औषध देण्यात येत नाही. लाखो लोकांचा मृत्यू हा अ‍ॅलोपॅथीचे औषध खाल्याने झाली आहे. जितके मृत्यू ऑक्सिजन आणि हॉस्पिटलमध्ये उपचार न मिळल्याने झाले नाहीत, त्यापेक्षा अधिक मृत्यू हे अ‍ॅलोपॅथीचे औषध खाऊन झाले असल्याचे अतिशय धाडसी वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले. मी खूपच मोठे वक्तव्य करत आहे, या वक्तव्यानंतर या मुद्द्यावर वाद निर्माण होऊ शकतो असेही बाबा रामदेव म्हणाले. स्टेरॉईड्समुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण अ‍ॅलोपॅथी आहे. अ‍ॅलोपॅथी संपुर्णपणे फेल आहे, असे मी म्हणत नाही. त्यावेळी मॉडर्न मेडिकल सायन्स आणि तंत्रज्ञानाला माझा विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण वेगवेगळे प्रयोग आणि त्याचे निष्कर्षावर त्यांनी बोट ठेवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या