Monday, May 6, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : भारतात रुग्णसंख्येतील घट कायम, महाराष्ट्रातील स्थिती काय?

COVID19 : भारतात रुग्णसंख्येतील घट कायम, महाराष्ट्रातील स्थिती काय?

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना गेल्या काही दिवसांपासून करोना रूग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. देशातून करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची चिन्हे आकडेवारीतून दिसत आहेत.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १ लाख ५२ हजार ७३४ नवे करोना रुग्ण आढळले असून ३ हजार १२८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ८० लाख ४७ हजार ५३४ इतकी झाली आहे.

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख २९ हजार १०० वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात २ लाख ३८ हजार ०२२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ५६ लाख ९२ हजार ३४२ वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात रोज कमी होणाऱ्या रुग्णसंख्या पाहता करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात रविवारी एका दिवसात सर्वात कमी १८ हजार ६०० नवी रूग्ण आढळले. तर ४०२ लोकांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ५७ लाख ३१ हजार ८१५ झाली आहेत, तर संसर्गामुळे एकुण ९४ हजार ८४४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या