Tuesday, May 7, 2024
Homeजळगावमुक्या प्राण्यांची तहान-भूक शमविण्यासाठी पशूपापाचा आधार

मुक्या प्राण्यांची तहान-भूक शमविण्यासाठी पशूपापाचा आधार

जळगाव – Jalgaon :

जळगाव शहरातील मुक्या प्राण्यांची तहान-भूक शमविण्यासाठी पशूपापा ऍनिमल प्रोटेक्शन संस्था, आधार बनली आहे.

- Advertisement -

या संस्थेतील तरुण स्वयंसेवकांच्या माध्यमातून जखमी, भटक्या श्‍वानांवरदेखील उपचार केले जातेय. त्यासाठी गिरणा पंपिंग परिसरामध्ये संस्थेच्यावतीने उपचार केंद्र सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या संस्थेमध्ये महाविद्यालयीन तरुणाईचा समावेश आहे.

मुक्या प्राण्यांसाठी जळगावात पशूपापा ऍनिमल प्रोटेक्शन संस्था कार्यरत आहे. मुक्या प्राण्यांची तहान-भूक भागविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच दररोज शहरात स्वयंसेवकांचे वेगवेगळे ग्रुप तयार करुन भटक्या कुत्र्यांसाठी अन्न पुरवठा केला जात असून, भूक शमविण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमिवर लॉकडाऊनचा फटका मुक्या प्राण्यांना बसला मात्र पशूपापा या संस्थेने आधार देण्याचे कार्य अविरतपणे सुरु आहे. पशू-पक्षांसाठी परळ वाटप करणे, गुरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ड्रम तसेच सिमेंटची टाक्या ठिकठिकाणी ठेवून तहान भागविली जात आहे.

संस्थेच्या कार्यात यांचा सहभाग

पशूपापा ऍनिमल प्रोटेक्शन संस्थेत महाविद्यालयीन तरुणाईचा समावेश आहे. यामध्ये खुशबू श्रीश्रीमाळ, कोमल श्रीश्रीमाळ, भावनी अग्रवाल, अनुज अग्रवाल, हर्षल भाटीया, तेजस श्रीश्रीमाळ, गुंजन पाटील, भूमिका पाटील, अभिषेक जैन, रक्षंद्र परदेशी, स्वरा चौधरी, डिंपल पंजाबी, कल्याणी वाघ, तृशिता वारुळे, सीमरण पारपियानी, ललित चौधरी, सागर कारडा, लक्षराज तलरेजा, संकेत महाजन, योगेश वानखेडे, सुयश जाधव, सुदर्शन भाटीया, भूमिका मंत्री, राहूल कौरानी, राहूल वर्मा, योगेश कोल्हे, श्रेयस सोरडे, चॉंद शेख, तनया देशमुख, भैरवी जैन, तेजू आर्या, गीत अरडेजा, निरज मांगुर्ले, राज नवांदे, दर्शन भावसार, ऋषिकेश रावेरकर यांच्यासह अनेक तरुण मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

ऍम्ब्युलन्सचीही सुविधा

शहरात भटक्या जखमी मुक्या प्राण्यांवर संस्थेच्या माध्यमातून उपचार केला जात आहे. त्यासाठी गिरणा पंपिंग परिसरात उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. तीन महिन्यात साधारणतः ८०० च्या वर मुक्या प्राण्यांवर उपचार करण्यात आले आहे. मुक्या प्राण्यांना घेवून जाण्यासाठी संस्थेची ऍम्ब्युलन्सदेखील आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या