Friday, May 3, 2024
Homeजळगावविजेच्या धक्क्याने २५ वर्षीय विवाहित युवकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने २५ वर्षीय विवाहित युवकाचा मृत्यू

रावेर – Raver – प्रतिनिधी :

दसनुर (ता. रावेर)येथील २५ वर्षीय विवाहीत युवकाचा वीज तारांच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली.याबाबत निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

येथील ओम अविनाश पाटील हे वाघोदा रस्त्यावर सुरू असलेल्या बांधकामावर स्लॅप करीता ठोकलेल्या सेंटिंगची पाहणी करण्यासाठी गेले असता, विज तारेचा स्पर्श होऊन ही घटना घडली.आजच त्याचा वाढदिवस होता.

वडील अविनाश बाजीराव पाटील हे वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणायला गेले होते. त्या दरम्यान बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.ओम पाटील एकुलता एक मुलगा होता,गेल्यावर्षी लग्न झालेले आहे.

अचानक पाटील परिवारावर कोसळलेल्या संकटाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत हितेश महाजन यांच्या फिर्यादी वरून निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून,रावेर येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

रात्री उशिरा दसनुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.लोंबकळत असलेल्या विजेच्या तारांमुळे घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या