Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये राऊत म्हणाले, वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची...

नाशिकमध्ये राऊत म्हणाले, वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची…

नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत एकांत भेट झाली होती. त्यानंतर माध्यमांमध्ये शिवसेना-भाजप पुन्हा जवळ येणार का? याविषयी चर्चा सुरु झाली. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुण्यात केले होते. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये उत्तर दिले.

- Advertisement -

YUVA Scheme: केंद्राच्या या योजनेतून महिन्याला मिळणार ५० हजार

संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुढील वर्षाच्या प्रारंभी नाशिक महापालिकेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीची तयारी सुरू असतानाच उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील पक्षसंघटनेचा आढावा घेतला जाणार आहे. चारही जिल्ह्यांतील पक्षसंघटनेतील पदाधिकाऱ्यांशी राऊत चर्चा करणार आहेत.

गुरुवारी त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, चंद्रकांत दादांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो.

पंतप्रधानांनी प्रचार करु नये

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची संधीही सोडली नाही. पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांनी राजकीय प्रचार करू नये, पश्चिम बंगालमध्ये जे झाले ते चुकीचे होते. बाळासाहेब ठाकरेही हीच भूमिका मांडायचे. तसेच भाजपाला जे यश मिळत आहे ते मोदींच्या चेहऱ्यामुळेच मिळत आहे. मोदी हेच भाजपाचे नेते आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

अनेक ठिकाणी महापालिका,जीप,लोकसभा,विधानसभा निवडणुका होत असतात. तिन्ही पक्ष आपआपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हांलाही वाटतं की आमचा आकडा विधानसभेवर १०० पार जावा. त्यासाठी आतापासून प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. तिन्ही पक्ष आपआपल्या पक्षासाठी काम करत आहेत. ते गरजेच आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

आज धुळ्यात जाणार

आज (ता. १०) दुपारी धुळे येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. शुक्रवारी (ता. ११) नंदुरबार व रावेर लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. शनिवारी (ता. १२) जळगावला पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. रविवारी (ता. १३) नाशिक व दिंडोरीतील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या