Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबारमाजी आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते कॅश पिकअप व्हॅनचा शुभारंभ

माजी आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते कॅश पिकअप व्हॅनचा शुभारंभ

नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar

तालुक्यातील ५ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या सर्व गावांमधे एटीएम सेवा देणार्‍या कॅश पिकअप व्हॅनचा शुभारंभ आज सोमवार दि.२१ जून रोजी माजी आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते काकासाहेब हिरालाल चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

- Advertisement -

नंदुरबार शहरातील काकासाहेब हिरालाल चौधरी पतसंस्थेच्या कार्यालयाबाहेर आज सकाळी ११ वाजता हा छोटेखानी कार्यक्रम झाला. ज्येष्ठ नेते काकासाहेब हिरालाल चौधरी व माजी आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते याप्रसंगी व्हॅनचे पुजन करण्यात आले.

नंतर नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. या आधी रनाळे येथेही शिरिष चौधरी यांच्या हस्ते बँकिंग पेमेंट सेवा देणार्‍या व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील ५ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या सर्व गावांमधे एटीएम सेवा देणार्‍या या कॅश पिकअप व्हॅनमुळे एक्सीस, एचडीएफसी आदी बँकांशी संबंधीत एटीएम पेमेंट सेवा सुकर होणार आहे,

अशी माहिती याप्रसंगी एरिया मॅनेजर दीपक कापडे यांनी दिली. याप्रसंगी नगरसेवक प्रशांत चौधरी, गौरव चौधरी तसेच बँक कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या