Monday, May 6, 2024
Homeनाशिकसातबारा हस्तदोष दुरुस्ती शिबिराचे आयोजन

सातबारा हस्तदोष दुरुस्ती शिबिराचे आयोजन

देवळा । प्रतिनिधी

तहसील कार्यालयाचे वतीने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 चे अभियाना अंतर्गत हस्तलिखीत मूळ सातबारा व संगणकीकृत सातबारा तंतोतंत जुळविण्यासाठी त्यात झालेल्या हस्तदोष चुका दुरुस्तीकामी दि. 24 जून ते 12 जुलै 2021 पर्यंत सकाळी 9 पासून गाववनिहाय शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती प्रभारी तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली.

- Advertisement -

महसूल दप्तरी सातबारा संगणकीकरणाची मोहीम सुरु आहे. संगणकीकृत करतांना कामकाजाच्या ओघात काही हस्तदोष झाल्याचे दिसून आले असून त्यात दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना तहसील कार्यालय व तलाठी कार्यालयामध्ये पाठ पुरावा करावा लागत आहे. यात जनतेचा वेळ वाया जात असून दप्तर दिरंगाईचा सूर जनतेत दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेऊन देवळा तहसिल कार्यालयाने या विशेष शिबिराचे जनतेच्या सोईसाठी आयोजन केले आहे.

या शिबिरास देवळा तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी त्यांच्या मिळकतीच्या सातबारा मध्ये झालेल्या हस्तदोषाच्या बाबतीत त्यांच्याकडील कागदोपत्री पुराव्यासह अर्ज करावा व या शिबिरास हजर रहावे, यावेळी तात्काळ निर्णय घेऊन हस्तदोषाचा निपटारा करुन जनतेच्या अडचणी दूर केल्या जाणार आहेत.

दरम्यान या बाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनीही जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत सूचित केलेले आहे. त्यानुसार विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून देवळा तालुक्यातील जनतेने त्यांच्या कडील कागदोपत्री पुराव्यांसह शिबिरास मोठ्या संख्येने हजर राहून सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार विजय बनसोडे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या