Wednesday, May 8, 2024
Homeनगरमनपाच्या कौन्सिल हॉलला पुर्नवैभव प्राप्त करुन देणार : घुले

मनपाच्या कौन्सिल हॉलला पुर्नवैभव प्राप्त करुन देणार : घुले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जुन्या मनपा कार्यालयातील कौन्सिल हॉल आगीत भस्मसात होऊन आता जवळजवळ सात वर्षे झाली आहेत. सामाजिक संघटनांनी या हॉलचे नुतनीकरण करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार पाहणी करण्यात आली असून या हॉलचे नुतणीकरणासाठी महापालिका जिल्हा नियोजन समितीकडे विशेष बाब म्हणून हॉलचा जिर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी सांगितले.

- Advertisement -

नगर महानगरपालिकेच्या जुन्या कॉन्सिल हॉलची पाहणी स्थायी समिती सभापती घुले यांनी गुरूवारी केली. यावेळी त्यांनी नुतनीकरणबाबतचा आढावा घेतला. याप्रसंगी भुषण देशमुख, रोटरी इंटीग्रेटी क्लबचे अध्यक्ष रफिक मुन्शी, विनित साठे, सुरेश इथापे आदि उपस्थित होते. यावेळी घुले म्हणाले, हा कौन्सिल हॉल ऐतिहासिक असून अनेक दिग्गजांच्या सभा, बैठका या हॉलमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे हा कौन्सिल हॉल नगरकरांच्यादृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अनेक आठवणी या कौन्सिल हॉलशी संबंधित आहेत.

सामाजिक संस्था घेत असलेला पुढाकारास सकारात्मक प्रतिसाद देत या हॉलला पुर्नवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आपण प्रयत्न करु, आश्वासन दिले. यावेळी देशमुख यांचे मनोगत झाले. मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त 29 जुनला सकाळी 8 वाजता या कौन्सिल हॉल स्वच्छता अभियान विविध संस्था राबविणार असल्याचेही मुन्शी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या