Thursday, May 2, 2024
Homeनगरशिक्षण क्षेत्रातील मागण्यांसाठी 5 जुलैला आंदोलन

शिक्षण क्षेत्रातील मागण्यांसाठी 5 जुलैला आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात (Pending demands in the education sector) पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे (State Government) लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने 5 जुलै रोजी एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय (statewide Dicision Movement) घेण्यात आला आहे. 5 जुलैला सर्व शिक्षक (Teacher), शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office), शिक्षण विभाग (Department of Education) व तहसील कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी केले आहे.

- Advertisement -

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या (Pending demands in the education sector) पुर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व संघटनेमार्फत वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा (Follow up with the state government) करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे शिक्षक परिषदेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनाच्या इशार्याचे पत्र शिक्षक परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण सचिवांना पाठविण्यात आले आहे.

या आंदोलनासाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, सहकार्यवाह नरेंद्र वातकर, कोषाध्यक्ष किरण भावठाणकर, कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, भगवान साळुंखे, महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी, कार्यालय मंत्री सुनील पंडित, मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर, शिवनाथ दराडे, उल्हास नागरगोजे, सोमनाथ राठोड, के. के. बाजपेयी, योगेश बंन, राजकुमार बोनकिले, राजेंद्र गुजरे, रवींद्र इनामदार, शशिकांत चौधरी, दिलीप अहिरे, नंदकिशोर झरीकर, सुरेश पठाडे आदी प्रयत्नशील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या